बार्शी : शहरातील उपळाई रोड परिसरातील विस्तार लक्षात घेता या भागात पोलीस चौकीची अंत्यत गरज निर्माण झाली आहे. या भागात वसतिगृह, शिकवणी क्लासेस, अभ्यासिका असून, या वाढीव परिसरात शिक्षण, हॉस्पिटल, नोकरीनिमित्त ग्रामीण भागातील असंख्य कुटुंब राहात आहेत. उपळाई रोडलगतच नाईकवाडी प्लॉट, पवार प्लॉट, चव्हाण प्लॉट, वायकुळे प्लॉट, शेंडगे प्लॉट, देशमुख प्लॉट, होनकळस प्लॉट, गोंदील प्लॉट, पराग इस्टेट, संपूर्ण भाग उपळाई रोड याचा समाविष्ट आहे. त्यातच या भागात चोऱ्या व विद्यार्थ्यांना छेडण्याचे गंभीर प्रकार होत आहेत. भांडण तंटे या भागात वारंवार होतात. उपळाई रोड हा भाग बार्शीचा सुशिक्षित वस्तीचा भाग म्हणून ओळखला जात असला तरी या भागात बार्शी शहर पोलीस स्टेशनची चौकी असणे अत्यंत गरजेचे आहे. बार्शी शहर पोलीस स्टेशन तीन ते चार किलोमीटरवर असल्याने या भागात कायदा - सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होतो. या परिसरात पोलीस चौकी व्हावी, अशी मागणी या प्रभागाचे नगरसेवक मदनलाल गव्हाणे यांनी जिल्हा पोलीस प्रमुख, सोलापूर यांच्याकडे निवेदनाव्दारे केली आहे.
उपळाई रोड परिसरात नवीन पोलीस चौकीची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 27, 2021 4:23 AM