यावेळी समितीचे निमंत्रक सचिन शिंदे, प्रा. सतीश देशमुख, महेंद्र शिंदे, प्रदीप खंकाळ, अविनाश जाधव, राजू शिंदे, अमर शेटे, अमोल राऊत, कुमार वाघमारे आदी उपस्थित होते. घरगुती व व्यावसायिकांची सक्तीची वसुली थांबवून टप्पे पाडून द्यावेत, बिलावरील व्याज, दंडव्याज माफ करावे, लॉकडाऊन काळातील फक्त मीटरभाडे घेऊन अंदाजे बिल कमी करावे, आदी मागण्या निवेदनात करण्यात आल्या आहेत. याप्रसंगी गजानन शिंदे, राहुल माळी, लाईनमन माळी यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.
कोट :::::::::::::::
आपल्या दुकानातील मीटरचे रीडिंग घेऊन या, त्याच्या फोटोमध्ये लाईट बिल जास्त असेल तर ते युनिटप्रमाणे घेतले जाईल. पण भाडे हे शासनाच्या नियमाप्रमाणे आहे ते भरावे लागेल. सक्तीची वसुली न करता सर्वांनी वसुली द्यावी. वरिष्ठ व शासनाच्या नियमाप्रमाणे वसुली सुरू आहे. काही अडचण असल्यास महावितरण ऑफिसला संपर्क साधा. आपल्या शंकेचे निरसन केले जाईल.
- माने
उपअभियंता, करकंब