पंधरा दिवसांत याबाबत ठोस निर्णय न झाल्यास प्रहारच्या वतीने तीव्र आंदोलन केले जाईल, असा इशाराही देण्यात आला आहे.
पंढरपूर हे तीर्थक्षेत्र असल्याने कुरुल ते पंढरपूर या रस्त्याचे डांबरीकरण करण्यात यावे तसेच नजीक पिंपरी ते इंचगाव हा मंगळवेढा व मोहोळला जोडणारा रस्ता अनेकदा रस्त्याचे काम होऊनही ठिकठिकाणी मोठमोठे खड्डे पडले आहेत. रस्त्याच्या दोन्ही बाजूंना साईडपट्टी व्यवस्थित नसल्याने अपघाताचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे या दोन्ही रस्त्याचे नवीन डांबरीकरण काम त्वरित मंजूर सुरू करावे, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे.
यावेळी प्रहार अपंग क्रांतीचे मनोज धोत्रे, शेतकरी संघटनेचे आबासाहेब पवार वैभव जावळे, प्रदीप सरवळे, त्रिंबक वाघमोडे, गणेश वाघमोडे आदी उपस्थित होते.
फोटो : ०६ कुरुल-रोड
कुरुल-पंढरपूर रस्त्याची अशी दुरवस्था झाली आहे.