सोलापूर : दिवाळी, दसरा असा कोणताही हिंदू सण असो.. या सणाला मुलगी आणि जावयाला आहेर करण्याची आपल्याकडे परंपरा आहे. या सणासाठी मुलगी जेव्हा जावयाबरोबर येते तेव्हा त्यांचे स्वागत खारीक खोबºयाच्या हाराने केले जाते. पूर्वभागात प्रत्येक घरामध्ये ही प्रथा पाळली जाते. शुक्रवार पेठेतील आठ व्यावसायिक महाशिवरात्रीपासून हे हार तयार करण्यात मग्न असून, त्यांनी तयार केलेले हारांनी बाजारपेठेतील दुकाने सजली आहे.
सोलापूर शहरात आणि ग्रामीण भागात गुढीपाडव्याला नातेवाईक आणि जावयांचे साखरेचे हार देऊन स्वागत केले जाते़ यंदाही शुक्रवार पेठ परिसर आणि मधला मारुती बाजार परिसरात काही कारखान्यांत खारीक-खोबºयाचे हार बनवण्याचे काम सुरू आहे़ जवळपास आठ कारखान्यांमधून या कामाला सुरुवात झाली आहे़ हार निर्मिती करणारे व्यावसायिक आणि त्यांचे कुटुंबदेखील या कामात गुंतले आहे़ काही समाजात जावयाला साखरेचा हार तर काही समाजात खोबºयाचा हार दिला जातो. परंतु या दिवशी हार देऊन स्वागत करण्याला विशेष महत्त्व दिले जाते, ही परंपरा सोलापूर जिल्ह्याबाहेर नसल्याने हे हारदेखील सोलापुरातच बनवले जातात. साधारण किलोवरचे हार बनवले जातात़ महाशिवरात्रीपासून हे हार बनवले जात आहेत. गुढीपाडव्याच्या आदल्या दिवसापर्यंत हे काम चालू राहते़ यंदा हारांच्या दरात फारशी वाढ झालेली नाही़ यंदा प्रतिकिलो २५० रुपयांनी या हारांची विक्री सुरू आहे.
पूर्व भागातील परंपरा
- - खारीक-खोबºयाच्या हाराची परंपरा सोलापूर शहरात सर्वाधिक पूर्व भागात पाळली जाते़ पद्मशाली समाजाने या परंपरेला खूप महत्त्व दिले आहे़ जावयांना नऊ आणि ११ खारीक-खोबºयाच्या वाट्यांचा हार गळ्यात घातला जातो़ विशेषत: नवीन जावयाला सक्तीने हार घालून लहान मुले खुशी मागतात़
लहान मुलांना पाच खोबरे वाटीचा हार
- - ज्याप्रमाणे जावयाच्या स्वागताला हार त्याचप्रमाणे घरातील लहान मुलांचेदेखील खारीक -खोबºयाच्या हारांनी स्वागत करण्याची परंपरा आहे़ लहान मुलांना मानेवर पेलता यावा म्हणून पाच खारीक आणि पाच खोबºयाच्या वाट्यांनी हा हार बनविला जातो़ विशेषत: तो चिमुकल्यांच्या गळ्यात शोभून दिसतो़