वैराग : ३० वर्षांपूर्वी मंजूर असलेले ग्रामीण रुग्णालय लवकरात लवकर सुरू करून तेथे रुग्णसेवा चालू करावी, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते अमरराजे निंबाळकर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे निवेदनाद्वारे यांनी केली आहे.
वैराग येथे ३० वर्षांपूर्वी शासने ग्रामीण रुग्णालय मंजूर केले आहे. मात्र, कामास सुरुवात झाली नाही तसेच राजकीय उदासीनतेचा अभाव असल्याने हे ग्रामीण रुग्णालय सुरू होऊ शकलेले नाही. त्यामुळे ३० वर्षांपूर्वी मंजूर झालेले ग्रामीण रुग्णालयाचे भिजत घोंगडे पडले आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर वैरागमध्ये ५४ गावांतील रुग्णांची वाढत आहे. वैराग शहर हे दळणवळणाचे मध्यवर्ती ठिकाण असल्याने नागरिकांची नेहमी वर्दळ असते. त्यामुळे दुर्लक्षित व प्रलंबित वैराग ग्रामीण रुग्णालयाचे कामकाज लवकर होणे अत्यंत गरज आहे तसेच वैराग भागामध्ये दररोज विविध अनेक लहान मोठ्या प्रकारचे गुन्हे, अपघात अशा घटना घडत असतात. अशाप्रसंगी रुग्णांना बार्शी किंवा सोलापूरला जावे लागते. हे रुग्णालय चालू करावे, अशी मागणी केली आहे.