वाळूज, देगाव स्थानकात गतिरोधक करण्याची मागणी
वाळूज : मोहोळ - वैराग रोडवर देगाव आणि वाळूज या दोन स्थानकासाठी चार रस्ते एकत्र आले आहेत. त्यामुळे चौकात वर्दळ जास्त असते. बरीच वाहने ही भरधाव वेगात धावतात. या ठिकाणी लहान-मोठे अपघात झाले आहेत .
या रस्त्यावर जिल्हा परिषद शाळा, माध्यमिक शाळा आणि आश्रमशाळांमधील विद्यार्थ्यांना रस्ता ओलांडताना कसरत करावी लागते. त्यामुळे या ठिकाणी गतिरोधक करावेत, अशी मागणी येथील ग्रामस्थांनी केली आहे.
येलमवाडी - देगाव रस्ता दुरुस्तीची मागणी
वाळूज : मोहोळ तालुक्यात येलमवाडी - देगाव रस्त्यावरील खडी पूर्ण उचकटलेली आहे. अतिवृष्टीमुळे रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले आहेत. या रस्त्यावर एकदाही डांबरीकरण झालेले नाही. रस्त्यावरील खड्ड्यांमुळे मोटारसायकलस्वारांना अपघाताला सामोरे जावे लागत आहे. काही जण जखमी झाले आहेत, तसेच या मार्गावर वाड्यावस्तीवरील शाळकरी मुले, दूधवाहिका, भाजीपाला यांची वाहने धावतात. हा रस्ता खडीकरण करून दुरुस्ती करावी, अशी मागणी शेतकरी, वाहनधारक यांच्यामधून होत आहे.