माळशिरस तालुक्यात १९ ठिकाणी लसीकरण सुरू आहे. यामध्ये ४ खाजगी व १५ सरकारी ठिकाणी लस दिली जात आहे. मात्र तुटवड्याअभावी लसीकरण केंद्रात अनियमितता दिसत आहे.
सुरवातीला कमी प्रतिसाद होता. मात्र गेल्या काही दिवसात हा वेग वाढला आहे. ६० वर्षावरील नागरिकांच्या लसीकरणाचा ओघ कमी दिसला.
४५ वर्ष वयोगटातील नागरिकांना लसीकरण सुरू केल्यापासून वाढ झाली. मात्र बहुतांश केंद्रावर लसीच्या तुटवड्यामुळे नागरिकांना हेलपाटे मारावे लागत आहेत तर काही केंद्रे बंद दिसत आहेत.
लसीकरणाचा आलेख
६ एप्रिलपर्यंत वैद्यकीय क्षेत्रातील कर्मचारी ४ हजार ६९४, फ्रंटलाईन कर्मचारी २ हजार ६१३, ज्येष्ठ नागरिकांना १२ हजार ५१० अशा २२ हजार ६२७ जणांचे लसीकरण झाले आहे. यापैकी २८०२ जणांनी दुसरा डोस घेतला आहे.