या मागणीचे निवेदन संघटनेच्या मुख्यमंत्र्यांसह उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत व प्रधान सचिव यांना निवेदनाद्वारे केली आहे. निवेदनात म्हटले, वाढता कोरोनाच्या संसर्गामुळे परिस्थिती गंभीर बनू लागली आहे. अशातच कोविड कार्यालयात वेळोवेळी उपस्थित रहावे लागत आहे. शिवाय कर्मचारी आजारी, रुग्णसंख्या व त्यातच अनेक रुग्ण मृत होत आहेत. त्यामुळे ज्या विद्यापीठ शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना व शासकीय कर्मचाऱ्यांना कोरोनाची बाधा झाली आहे, त्यांना उपचारासाठी व आयसोलेशनसाठी ४० दिवसांपर्यंतची नियमित वैद्यकीय रजा खर्ची होत असल्याने अशांना शासनाने इतर आजारांसाठी दिलेली वैद्यकीय रजा संपून जात आहे. त्यामुळे शासनाने प्राधान्याने या मागणीचा विचार करून विद्यापीठ व संलग्न महाविद्यालयीन शिक्षकेतर कर्मचारी व राज्यातील सर्वच सरकारी, निमसरकारी कर्मचारी बांधवांसाठी कोविड विशेष वैद्यकीय रजेची तरतूद करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
ही मागणी तानाजी ठोंबरे, प्रवीण मस्तुद, उमेश मदने, आरती रावळे, ए.बी. कुलकर्णी, विलास कोठावळे, हनुमंत करमकर यांनी केली आहे.