रेल्वे मंत्रालयाने सुरू केलेल्या सांगोला-मुझफ्फरपूर, बंगळुरू-सांगोला-आदर्शनगर (दिल्ली), सांगोला-सिकंदराबाद, सांगोला-शालिमार (कलकत्ता) अशा चार किसान रेल्वेच्या माध्यमातून डाळिंब, सिमला मिरचीची वाहतूक केली जात आहे.
शेतमाल, भाज्या, फळे या घटकाच्या व्यापाराकरिता व्यापारी, शेतकऱ्यांना किसान रेल्वे उपयुक्त ठरली आहे. शेतकऱ्यांचा किसान रेल्वेला वाढता प्रतिसाद मिळत असल्याने शेतकऱ्यांसह रेल्वेलाही याचा फायदा झाला आहे. शेतमाल व जीवनावश्यक वस्तूची जलद गतीने वाहतूक करण्यासाठी सांगोला स्थाकातून मंगळवार व गुरुवार या दोन दिवशी आदर्शनगरसाठी (दिल्ली) आणखी दोन किसान रेल्वे सुरू करण्याची मागणी रेल्वेमंत्री पीयूष गोयल व खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांच्याकडे केदार-सावंत यांनी केली आहे.
-------
अन्नप्रक्रिया उद्योग मंत्रालयाने प्रायोगिक तत्त्वावर ऑपरेशन ग्रीन योजनेचा विस्तार करून फळे आणि भाजीपाला या कक्षेत आणण्याची घोषणा केली आहे. त्यानुसार फळे व भाजीपाला रेल्वेतून वाहतूक करण्यासाठी ५० टक्के सवलत देण्यात येत आहे. त्यात द्राक्ष, खरबूज, कलिंगड व बोर या फळांनाही वाहतूक दरात ५० टक्के सवलत मिळावी.
- चेतनसिंह केदार-सावंत, तालुकाध्यक्ष, भाजप