माढा : शहरातील दुकाने नियमितपणे सुरू करण्याची मागणी येथील व्यापाऱ्यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे केली आहे. तसेच व्यापाऱ्यांनी तहसीलदार आणि माढा पोलीस ठाण्यातही अधिकाऱ्यांना या मागणीचे निवेदन दिले.
लाॅकडाऊन काळात व्यापारी उद्ध्वस्त झाला आहे. यातून सावरण्याचा प्रयत्न असतानाच पुन्हा २५ दिवसांचा लाॅकडाऊन लावणे अन्यायकारक असल्याचे व्यापाऱ्यांचे मत आहे. शासनाने घालून दिलेल्या नियमांचे पालन करीत व्यवसाय सुरू करण्यास परवानगी देण्याची मागणी व्यापारी संघटनेने केली आहे.
यावेळी भारत भाकरे, नितीन दोशी, संदीप कुर्डे, बाळासाहेब रोटे, संभाजी भांगे, नितीन भांगे, विनायक कासार, बद्रीनाथ रोटे, धनाजी साळुंखे, चेतन शहा, सुनील कुंभार, निलकंठ भाजीभाकरे, योगेश शिंदे, सुनील चवरे आदी व्यावसायिक उपस्थित होते.
--
०७ माढा
माढा शहरात व्यवसाय सुरू ठेवण्यास परवानगी द्यावी या मागणीचे निवेदन पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांना देताना नितीन जोशी, विनायक कासार, संभाजी भांगे, बंडू भांगे, राहुल पडदुणे