कोरोनासारख्या आपत्कालीन परिस्थितीमध्ये ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांनी योगदान दिलेले असतानाही त्यांचा ५० लाखांचा आरोग्य विमा प्रस्ताव जिल्हा परिषदमध्येच धूळखात पडला आहे. ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या सेवा विषयक बाबी अपूर्ण आहेत. १ एप्रिल २००७ पासूनचा राहणीमान भत्ता आणि मागील फरक देण्यात यावा, प्रा. फंड रक्कम कर्मचाऱ्यांच्या खात्यावर जमा करावी, निश्चित केलेल्या दराप्रमाणे किमान वेतन व राहणीमान भत्ता, विशेष भत्ता न देणाऱ्या ग्रामपंचायतींवर कामगार कायद्यानुसार कारवाई करण्यात यावी, प्रोत्साहन भत्ता देण्यात यावा, पंचायत समितीने तक्रार निवारण करता बैठक आयोजित करावी, यासह विविध मागण्यांसाठी हे आंदोलन सुरु केले आहे.
यावेळी संघटनेचे जिल्हाध्यक्ष दिलीप जाधव, जिल्हा कार्यकारिणी सदस्य रमेश कोळी, धनाजी पांढरे, बाबा कोळी, भगवान कांबळे, पांडुरंग खरात, तालुकाध्यक्ष छाया लोंढे, उपाध्यक्ष बंडू चंदनशिवे, अशोक वाघमोडे, तालुका सचिव संतोष गायकवाड, युवराज नरुटे, कल्याण कौलगे, विष्णू जरग, सुतकर यासह तालुक्यातील ग्रामपंचायतीचे कर्मचारी उपस्थित होते.
१४मोहोळ-आंदोलन
----
ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी मोहोळ पंचायत कार्यालयासमोर धरणे आंदोलन करताना मोहोळ तालुक्यातील ग्रामपंचायत कर्मचारी.