पंढरपूर : योग विद्याधाम, पंढरपूर, लायन्स क्लब आणि रोटरी क्लब, पंढरपूर यांच्या संयुक्त विद्यमाने सावरकर वाचनालय, प्रभा हिरा प्रतिष्ठान, शिंदेशाही, अरिहंत पब्लिक स्कूल, द. ह. कवठेकर प्रशाला येथे योगासनाची प्रात्यक्षिके सादर करण्यात आली.
ओंकार प्रतिमा व योगमहर्षी पतंजली यांच्या प्रतिमा पूजनाने योगासनाला सुरुवात झाली. विजया नाईक यांनी योगगीत सादर केले. शासनाच्या प्रोटोकॉलमधील योगासने, जलनेती प्रात्यक्षिकाशिवाय कोविडसाठी उपयुक्त ठरलेल्या भ्रामरी प्राणायाम व दीर्घश्वसनाचे शास्त्रीय प्रशिक्षण योगतज्ज्ञ अशोक ननवरे यांनी सादर केले. व्हर्च्युअल झुम ॲपच्या माध्यमातून असंख्य नागरिकांनी योग साधकांनी प्रात्यक्षिके केली. योग गुरु अशोक ननवरे यांनी योगा व प्राणायाम यांची माहिती सांगितली. रोटरी क्लबचे नूतन अध्यक्ष किशोर निकते, किशोर ननवरे, योगशिक्षिका प्रिया विभुते, शाहुराजे जाधव, विष्णू देठे, आशिष शहा, संगीता ननवरे, नीता जामदार, गुजराथी, स्वाती ननवरे यांनी परिश्रम घेतले.
----
२२ पंढ
योगधामच्या शिबिरात योगासनांची प्रात्यक्षिके सादर करताना विजया नाईक आदी.