शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL Auction 2025: ७२ खेळाडूंना मिळाला खरेदीदार, ४६७ कोटींची उलाढाल! कोणता खेळाडू कुठल्या संघात? पाहा यादी
2
लाडक्या बहिणींना मिळणाऱ्या ₹1500 चे लवकरच ₹2100 होणार, मुख्यमंत्री शिंदेंची मोठी घोषणा!
3
IPL Auction 2025: डेव्हिड वॉर्नर ते पियुष चावला... 'हे' खेळाडू राहिले UNSOLD! सर्वच संघांनी फिरवली पाठ
4
IPL Auction 2025: पहिल्या दिवसात ७२ खेळाडूंची विक्री, पाहा कोण ठरले Top 10 महागडे शिलेदार
5
TATA IPL Auction 2025 Live: ७२ खेळाडूंचं 'शॉपिंग'; ४६७.९५ कोटींची बोली... पहिल्या दिवशी भारतीय खेळाडूंचा बोलबाला
6
"प्रिय बंधु-भगिनींनो... सप्रेम नमस्कार..."! देवेंद्र फडणवीस यांचं जनतेला पत्र; सांगितले विजयाचे 4 'खरे शिल्पकार'
7
IPL Auction 2025 : RR च्या नाकावर टिच्चून MI नं खेळला मोठा डाव; ६२ धावांच्या 'त्या' इनिंगमुळे हा खेळाडू रात्रीत 'करोडपती'
8
IPL Auction 2025: तब्बल ५ तासांनी Mumbai Indians ने विकत घेतला पहिला खेळाडू, १२.५० कोटींना कोण आलं संघात?
9
'ज्यांनी मला त्रास दिला ते सगळे साफ झाले', अशोक चव्हाणांची थोरात-देशमुखांवर बोचरी टीका
10
IPL Auction 2025: मुंबई इंडियन्सने सोडलेला जोफ्रा आर्चर अखेर राजस्थान रॉयल्समध्ये गेला, किती मिळाली किंमत?
11
शिवसेना मुख्यमंत्री पदावर अडीच वर्षासाठी दावा करणार? केसरकर स्पष्टच बोलले...!
12
'तरुण नेतृत्व उभारणार, घरी बसणार नाही', पराभवानंतर शरद पवार नव्या जोमाने कामाला लागले
13
"सर्वेक्षण करा, जी ज्याची जागा असेल त्याला देऊन टाका..."; संभल जामा मशीद प्रकरणावर काय म्हणाले राकेश टिकैत?
14
IPL Auction 2025 : MI नं दिला नाही भाव; Ishan Kishan साठी काव्या मारन यांनी लावली एवढ्या कोटींची बोली
15
IPL Auction 2025 : बिग सरप्राइज! SRK च्या KKR नं रिलीज केलेल्या खेळाडूसाठी मोजली मोठी किंमत, अनेकांच्या भुवया उंचावणारी बोली
16
IPL Auction 2025: 'अनुभवी' अश्विनसाठी दोन जुने संघ भिडले, अखेर CSK ने RR ला दिली मात, कितीला विकत घेतलं?
17
IPL Auction 2025: Gujarat Titans ची शांतीत क्रांती! ३ मॅचविनर खेळाडूंना 'गपचूप' घेतलं ताफ्यात, पाहा कोण?
18
"योगी आदित्यनाथांच्या 'त्या' घोषणेमुळे...";'बटेंगे तो कटेंगे'वर शरद पवारांचे महत्त्वाचे विधान
19
"...त्यामुळे महिलांनी आमच्या विरोधात मतदान केलं"; निकालानंतर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया

सोलापुरात दहा वर्षांपर्यंतच्या मुलांनाही डेंग्यू; पालकांनो, लक्षणांवर द्या लक्ष !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 03, 2021 3:52 PM

ऑगस्टमध्ये सर्वाधिक रुग्ण : काळजी घेण्याचा डॉक्टरांचा सल्ला

सोलापूर : कोरोना रुग्णांची संख्या कमी होत असताना डेंग्यू डोके वर काढत आहे. शहरात जुलै महिन्यात डेंग्यू रुग्णांची संख्या १८५ होती, तर ऑगस्ट महिन्यात यात वाढ होऊन ३२३ इतकी डेंग्यू रुग्णांची संख्या झाली. यात सुमारे ४० टक्के रुग्ण हे १० वर्षांखालील आहेत,  तर ३१ टक्के  डेंग्यूचे रुग्ण हे १० ते २० वर्ष वयोगटातील आहेत. या संख्येचा विचार करता लहान मुलांची अधिक काळजी घेण्याची गरज आहे.

जून महिन्यापासून पावसाची सुरुवात होते. तेंव्हापासून डेंग्यूचे रुग्ण आढळत आहेत. पावसाचे पाणी साचल्यास त्यात अळ्या निर्माण होऊन डेंग्यू, हिवताप सारखे आजार होतात. यामुळे पावसाळ्यात अशा आजारापासून सुरक्षित राहणे गरजेचे असते. डेंग्यू, मलेरिया या डासांचा नाश करण्यासाठी आरोग्य विभाग व महापालिकेचा कीटकनाशक विभाग स्वच्छतेच्या कामात सक्रिय सहभाग घेत आहेत. कोरोनासह साथीच्या आजारांवर उपचार करण्यासाठीही पालिकेच्या दवाखाने, आरोग्य केंद्रांसह रुग्णालयांमध्ये उपाययोजना करण्यात आल्या आहेत.

नागरिकांनी डेंग्यू, मलेरिया होऊ नये याची काळजी घ्यावी. फ्रीज, कुलर, रिकामे टायर, भांडी यात पाणी साचले असल्यास ते स्वच्छ करावे. पाऊस पडल्यानंतर अशा वस्तूंकडे विशेष लक्ष देण्याचे आवाहन आरोग्य विभागातर्फे करण्यात आले आहे.

दाट वस्तीत अधिक डेंग्यूचे रुग्णशहरातील दाट वस्तीत डेंग्यूचे अधिक रुग्ण आढळत आहेत. न्यू पाच्छा पेठ, जोडभावी पेठ, शेळगी, भवानी पेठ, बेगम पेठ या भागात डेंग्यूच्या रुग्णांची संख्या अधिक आहे. जिल्हा हिवताप अधिकारी डॉ. एकनाथ बोधले, सहायक जिल्हा हिवताप अधिकारी विजय बागल, महापालिकेतील जीवशास्त्रज्ञ पूजा नक्का यांच्या मार्गदर्शनाखाली आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सहाय्याने शहरात कंटेनर सर्वेक्षण सुरू आहे.

ही लक्षणे दिसताच डॉक्टरांना दाखवा

  • अचानक चढणारा ताप, डोकेदुखी, अंगदुखी, सांधेदुखी ही मुख्य लक्षणे
  • रक्तस्रावित डेंग्यू तापाचे निदान हे हात-पाय, चेहरा व मान यावर आलेल्या पुरळांवरून केले जाते.
  • डोकेदुखी, भूक मंदावणे, मळमळणे व पोटदुखी 
  • नाकातून, हिरडयातून व गुदद्वारातून रक्तस्राव ही लक्षणे कमी प्रमाणात आढळून येतात.

सिव्हिलमधील लहान मुलांचा वॉर्ड फुल्ल

  •  सिव्हिल हॉस्पिटलमधील लहान मुलांचा वॉर्ड हा फुल्ल झाला आहे. डेंग्यू व डेंग्यूसदृश आजाराचे रुग्ण हे सर्वाधिक आहेत. अनेक मुलांमध्ये डेंग्यूचे लक्षणे दिसत असताना त्यांचा अहवाल डेंग्यू पॉझिटिव्ह येत नाही. या प्रकारच्या रुग्णांची सोनोग्राफी करून त्यांच्यावर उपचार करण्यात येत आहेत. 
  •  सिव्हिलच्या जनरल वॉर्डाची क्षमता ९० असताना १०५ बालरुग्ण उपचार घेत आहेत, तर आयसीयुची क्षमता १५ असताना २६ बालरुग्णांवर उपचार करण्यात येत असल्याचे बालविकार तज्ज्ञ डॉ. शाकीरा सावस्कर यांनी सांगितले.

 

टॅग्स :SolapurसोलापूरHealthआरोग्यdengueडेंग्यूdocterडॉक्टरhospitalहॉस्पिटल