जिच्या हाती पाळण्याची दोरी, ती जगाते उद्धारी असे म्हटले जाते ते खरे असून,जर महिला पुढे आल्या तर कुटुंब व समाजव्यवस्था सुधारेल, असे प्रतिपादन सरपंच साठे यांनी केले. महिलांच्या सुविधेसाठी ग्रामपंचायतीतर्फे सॅनेटरी, नॅपकीन मशीन व इन्सोलेशन मशीन अंगणवाडी सेविकांकडे सुपूर्द करण्यात आली. ‘मुली वाचवा, देश वाचवा’ हा संदेश ग्रामस्थापर्यंत पोहोचवत महिला दिनानिमित्त या गावात या पुढे जन्माला येणाऱ्या मुलींसाठी प्रत्येक मुलींच्या नावे २ हजार रुपये फिक्स डिपॉझिट (एफडी) म्हणून ठेवले जातील, अशी घोषणा करून मुलींसाठी अनोखी भेट दिली.
यावेळी सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन ग्रा. पं. सदस्या माधुरी माळी व लक्ष्मी ताकमोगे यांच्या हस्ते करण्यात आले. गावातील ज्या महिलांना फक्त मुलीच आहेत त्यांना गुलाबपुष्प व श्रीफळ देऊन सन्मान करण्यात आला.
यावेळी सरपंच - बालाजी साठे, उपसरपंच - सुधीर कोळेकर,
ब्रह्मदेव फंड, ग्रामसेवक सोमनाथ सोनवणे, तुकाराम खोचरे, महादेव खोचरे, सचिन खोचरे, रंजना कुलकर्णी आदी मान्यवर ग्रामस्थ
उपस्थित होते.
फोटो १२ नरखेड-भोयरे ग्रामपंचायत
भोयरे येथे ग्रामपंचायतीच्या वतीने सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस अभिवादन करताना मान्यवर.