शहरं
Join us  
Trending Stories
1
जम्मू-काश्मीरमध्ये हिंदूंचे टार्गेट किलिंग; नाव विचारुन झाडल्या गोळ्या, 27 जणांच्या मृत्यूची भीती
2
'दोषींना सोडणार नाही, कठोर शिक्षा...', पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर PM मोदींची तीव्र प्रतिक्रिया
3
पहलगाम हल्ल्यानंतर पंतप्रधान मोदींचा गृहमंत्र्यांना फोन; अमित शाहांना जम्मू-काश्मीरला जाण्याची सूचना
4
'हा' अमित मिश्रा वेगळा... कौटुंबिक हिंसाचाराचे आरोप झालेला क्रिकेटर नेमका कोण? जाणून घ्या...
5
"...तर भविष्यात भयानक परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता होती"; 'वक्फ'बाबत किरण रिजिजूंचे वक्तव्य
6
फक्त मराठीच अनिवार्य, हिंदी सक्तीवर सरकारचे एक पाऊल मागे; नवीन आदेश काढणार
7
तुम्हाला वारंवार तहान लागते, पाणी प्यायल्यावरही घसा कोरडा होतो? 'या' गंभीर आजारांचे संकेत
8
मत्स्य व्यवसायाला कृषी क्षेत्रासारखाच दर्जा; मंत्रिमंडळ बैठकीत अनेक महत्त्वपूर्ण निर्णय
9
बँकेने गुन्हा दाखल केल्याने त्याची सटकली, साथीदारांना सोबत घेत अख्खी बँकच पेटवली
10
UPSC पास झाल्यानंतर उमेदवारांना पहिला पगार कधी आणि किती मिळतो? पाहा...
11
"मुस्लीम राजेशाही असो अथवा लोकशाही, वक्फ सर्वत्र...;" सौदीत पोहोचलेल्या PM मोदींवर ओवेसींचा निशाणा
12
Jammu and Kashmir : दहशतवाद्यांनी पर्यटकांना आधी विचारला 'हा' प्रश्न अन् सुरू केला गोळीबार, नेमकं काय घडलं?
13
दहशतवाद्यांनी आधी धर्म विचारला, नंतर झाडल्या गोळ्या, पहलगाम हल्ल्यातील जखमींचा धक्कादायक दावा   
14
'नरेंद्र मोदी जगातील सर्वात लोकप्रिय नेते', जेडी व्हेन्स यांनी केले पंतप्रधानांचे कौतुक...
15
IPL 2025: हर्षा भोगलेंना KKRच्या मॅचमधून मुद्दाम वगळलं? खुद्द त्यांनीच दिलं स्पष्टीकरण
16
तेव्हा सलग १७ वर्षे घटत होते सोन्याचे दर, झालं होतं एवढं स्वस्त, मात्र आता...  
17
जालना: बॉयफ्रेंडकडून बदनामीच्या धमक्या, १८ वर्षीय तरुणीने संपवलं आयुष्य, मृतदेह कुठे सापडला?
18
टेबल फॅन खूपच खराब झालाय? स्वच्छ करण्यासाठी पाहा 'ही' सोपी पद्धत, पंखा दिसेल नव्यासारखा
19
नरेंद्र मोदींचं विमान सौदी अरेबियाच्या हवाई हद्दीत प्रवेश करताच घडलं असं काही, सारेच अवाक्
20
सलग सहाव्या दिवशी बाजार तेजीत बंद; 'या' बँकांच्या शेअर्सने खाल्ला भाव; कोणत्या सेक्टरमध्ये घसरण?

पंढरपुरातील कार्तिक यात्रेतील शासकीय पूजा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस करणार

By appasaheb.patil | Updated: October 18, 2022 16:02 IST

ह. भ. प. गहिनीनाथ महाराज औसेकर यांची माहिती; विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समिती देणार लवकरच देणार निमंत्रण

पंढरपूर : श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीचा भाविकांच्या दर्शनरांगेसाठी असलेला श्री संत ज्ञानेश्वर महाराज दर्शन मंडप पाडण्याबाबतचा प्रस्ताव तीर्थक्षेत्र विकास आराखड्यात आहे. याबाबत मंदिर समितीला विश्वासात घेतले नसून मंदिरासंदर्भात विकासकामे करताना समितीला विश्वासात घ्यावे, असे मत समितीचे सहअध्यक्ष ह. भ. प. गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी व्यक्त केले.

दरम्यान, पुढील महिन्यात होत असलेल्या कार्तिक वारीची शासकीय महापूजा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. लवकरच फडणवीस यांना निमंत्रण देण्यात येणार असल्याचेही यावेळी सांगण्यात आले. श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीच्या बैठकीनंतर औसेकर महाराज यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी संजय जाधव, व्यवस्थापक बालाजी पुदलवाड, सदस्य संभाजी शिंदे, ॲड. माधवी निगडे यांच्यासह अन्य सदस्य उपस्थित होते.

ह. भ. प. औसेकर महाराज यांनी कार्तिकी यात्रेच्या शासकीय महापूजेसाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निमंत्रण पाठवणे, मंदिर समितीच्या कर्मचाऱ्यांना जादा कामाचा भत्ता, दिवाळीसाठी सानुग्रह अनुदान, बक्षीस, दिवाळी अग्रीम देणे, भक्तनिवास येथे निवासासाठी आलेल्या यात्रेकरूंसाठी ई-बस सुविधा उपलब्ध करुन देणे, विविध सण, यात्रा, उत्सवातील विठ्ठलाच्या मिरवणुकीसाठी तसेच पालखी सोहळ्यासाठी दानशूर भाविकांमार्फत रथ उपलब्ध करून घेणे, गोळेशाळेत विविध विकासात्मक कामे करणे, भाविकांना चप्पल स्टँड व दर्शन रांगेत प्री-फॅब्रिकेटेड शौचालये उपलब्ध करून देण्याचे ठरल्याचे सांगितले.

 

टॅग्स :SolapurसोलापूरPandharpurपंढरपूरPandharpur Vitthal Rukmini Templeपंढरपूर विठ्ठल रूक्मिणी मंदीरDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस