आता शनिवार अन् रविवारीही शाळा सुरु राहणार?; अजित पवारांचं शिक्षकांना महत्त्वाचं आवाहन
By ऑनलाइन लोकमत | Published: February 9, 2022 02:57 PM2022-02-09T14:57:09+5:302022-02-09T15:01:28+5:30
कोरोना महामारीच्या काळात राज्यातील शाळा जवळपास ७०० दिवस बंद होत्या. दोन वर्षे कोरोनामुळे विद्यार्थी शाळेत जाऊ शकले नाहीत.
सोलापूर/मुंबई: गेल्या दोन वर्षांपासून कोरोनामुळे विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची मोठ्या प्रमाणात नुकसान झाल आहे. मात्र आता प्रत्यक्ष शाळा सुरु झाल्या आहेत. पण अभ्यासक्रम भरुन काढण्याचं शिक्षकांसमोर एक मोठं आव्हान उभं ठाकल्याचं दिसून येत आहे. त्यामुळे शिक्षकांनी आता शनिवार आणि रविवारी देखील शाळा सुरु ठेवून अभ्यासक्रम भरुन काढला पाहिजे, असं आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज्यातील शिक्षकांना केलं आहे. सोलापूर जिल्हा परिषदेच्या स्वच्छ शाळा, सुंदर शाळा उपक्रमाच्या पारितोषिक वितरण कार्यक्रमात बोलताना अजित पवारांनी हे आवाहन केलं आहे.
कोरोना महामारीच्या काळात राज्यातील शाळा जवळपास ७०० दिवस बंद होत्या. दोन वर्षे कोरोनामुळे विद्यार्थी शाळेत जाऊ शकले नाहीत. आता कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होत असल्याने शाळा सुरू करण्याचा निर्णय जिल्हा प्रशासनाने स्थानिक पातळीवर घेतला आहे. शाळा सुरू होत असल्या तरी पालकांनी विद्यार्थ्यांना शाळेत पाठवणे बंधनकारक करण्यात आलेले नाही. सध्याच्या परिस्थितीनुसार ज्यांना योग्य वाटते त्या पालकांनी विद्यार्थ्यांना शाळेत पाठवावे, असं अजित पवार यांनी म्हटलं आहे.
यावेळी अजित पवार म्हणाले की, दोन वर्षे कोरोनामुळे मुले शाळेत गेली नाहीत. मात्र ही मुलं चांगल्या,स्वच्छ व सुंदर वातावरणात शाळेला जावी, यासाठी तुम्ही स्वच्छ व सुंदर अभियान राबविले ते अतिशय कौतुकास्पद आहे. हे अभियान मी पुणे जिल्हा व राज्यात राबविण्यासाठी सूचना करणार आहे, असं अजित पवार यांनी यावेळी म्हटलं.
आज सोलापूर येथे पार पडलेल्या स्वच्छ शाळा – सुंदर शाळा जिल्हास्तरीय पुरस्कार वितरण समारंभात ऑनलाईन पद्धतीनं सहभागी झालो. सदर उपक्रम राज्यात राबवण्याचे आवाहन यावेळी केले. pic.twitter.com/SmeICasXp5
— Ajit Pawar (@AjitPawarSpeaks) February 8, 2022
दरम्यान, सोलापूर जिल्हा परिषदेंतर्गत ‘स्वच्छ शाळा, सुंदर शाळा’या उपक्रमात श्री शिवाजी विद्यालय व जुनियर कॉलेजने सहभाग नोंदवून भौतिक सुविधेसह गुणवत्तापूर्ण शिक्षण, माझी वसुंधरा अभियान, एक पद-एक वृक्ष या उपक्रमांची यशस्वीरीत्या अंमलबजावणी करून जिल्ह्यात प्रथम क्रमांक प्राप्त केला.
रयत शिक्षण संस्थेचे चेअरमन डॉ. अनिल पाटील, विभागीय चेअरमन संजीव पाटील, सचिव, सहसचिव, विभागीय अधिकारी, सहायक विभागीय अधिकारी, पर्यवेक्षक यु. व्ही. रायभान, स्थानिक स्कूल कमिटी सदस्य डॉ. विलास खांडेकर, ज्ञानोबा खबाले, शाळा व्यवस्थापन समिती, सरपंच संजीवनी लुबाळ, उपसरपंच महादेव येळे, केंद्रप्रमुख बी. एम. जाधव, ग्रामपंचायत सदस्य, शिक्षक-पालक संघ, माजी