१५ सदस्य संख्या असलेल्या ग्रामपंचायतीवर गेली १० वर्षे जनकल्याण महाविकास आघाडीची सत्ता आहे. मागील दोन निवडणुकीत माजी सरपंच स्वतः शिवाजी दोन-दोन वाॅर्डातून तर मुलगाही पराभूत झाला होता. आता या निवडणुकीसाठी शिवाजी नन्नवरे यांच्या विरोधात एका जागेवर माजी सरपंच लिंबूतात्या कदम यांचे नातू स्वप्निल कदम लढत देत आहेत. तर दुस-या ठिकाणी तंटामुक्त समितीचे अध्यक्ष शिवाजी पाटील यांचे पुतणे रोहित पाटील रिंगणात आहेत. दुरंगी लढत होत असली तरी विकासाच्या मुद्यावर जनकल्याण महाविकास आघाडीचा भर आहे.
वाॅर्ड चारमध्ये दोन चुलत भावातच चुरशीची लढत होत आहे.
चौकट
१० लाखांसाठी निवडणूक
मागील वर्षी वांगी गावाने वाॅटर कपमध्ये तालुक्यात प्रथम क्रमांक मिळविला. या गावाला मिळालेली १० लाख बक्षिसाची रक्कम खात्यावर शिल्लक आहे. बिनविरोधसाठी प्रयत्न झाले; मात्र १० लाखांसाठी निवडणूक लागल्याचे सांगितले जाते.