अक्कलकोटमध्ये १६ जानेवारीपासून कोरोना प्रतिबंधक लस देण्यास सुरुवात केली आहे. सुरुवातीला म्हणावा तसा प्रतिसाद मिळत नव्हता. त्यामुळे शासनाने प्रथम आरोग्य अधिकारी, कर्मचारी, त्यानंतर महसूल, पोलीस, पंचायत समिती, पोलीस पाटील आशा विविध घटकातील कोरोना काळात रस्त्यावर उतरून ज्यांनी काम केले आहे, अशांना पहिल्या टप्प्यात लस दिली. त्यानंतर ६० वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना लस देण्यास सुरुवात केली. त्यानंतर ४५ ते ५९ वयोगटातील नागरिकांना असे टप्प्याटप्प्याने लस देण्याचे काम सुरू आहे. आतापर्यंत ७ हजार ५४७ नागरिकांना आरोग्य विभागाकडून लस दिली आहे. या मोहिमेला तालुक्यात प्रतिसाद मिळत असताना, शासनाकडून येणाऱ्या लसीचा तुटवडा भासत आहे.
मागील तीन दिवसांपासून शनिवार, रविवार, सोमवार असे सलग सुट्ट्या व लसीचे तुटवडा यामुळे लसीकरण बंद झालेले आहेत. यामुळे लस घेण्यासाठी आलेल्या अनेकांना परत जावे लागत आहे.
चौकट
नऊ केंद्रावर सुविधा
शहरातील ग्रामीण रुग्णालय तर ग्रामीण भागातील चप्पळगाव, शिरवळ, वागदरी, मैंदर्गी, दुधनी, नागणसूर, जेऊर, करजगी या आठ प्राथमिक आरोग्य केंद्र असे एकूण ९ ठिकाणी कोरोना विरोधी लस देण्याचे काम सुरू आहे.
कोट :::::::::::
तालुक्यात आतापर्यंत साडेसात हजारहून अधिक लोकांना कोरोना प्रतिबंधक लस दिली आहे. पण, एकालाही कसलाच त्रास झालेला नाही. १ एप्रिलपासून सर्वच वयोगटातील नागरिकांना लस देण्यात येणार आहे. याबाबत कोणीही गैरसमज पसरवू नये. जास्तीत-जास्त लोकांनी लस घ्यावी. एक, दोन दिवसात लस उपलब्ध होणार आहे.
- डॉ. अश्विन करजखेडे,
तालुका आरोग्य अधिकारी