सोलापूर : सोलापूर आणि अहमदनगर जिल्ह्यातील माळढोक अभयारण्याच्या संवदेनशील क्षेत्राची सीमा निश्चिती अखेर झाली आहे. केंद्रीय पर्यावरणमंत्री प्रकाश जावडेकर यांनी याबाबतची अधिसूचना अखेर जाहीर केली आहे. यामुळे सोलापूर, अहमदनगर जिल्ह्यातील उद्योगवाढीचा महत्त्वाचा अडथळा दूर झाला आहे. माळढोक अभयारण्यातील संवेदनशील परिक्षेत्राची निश्चिती नव्याने करण्यात यावी, अशी मागणी दोन जिल्ह्यातील उद्योजकांनी केली होती. सोलापूर आणि अहमदनगर जिल्ह्यातील संवेदनशील क्षेत्र निश्चित नसल्याने अनेक उद्योजकाना परवाने मिळाले नाहीत. अनेक उद्योजकांनी बेकायदेशी बांधकामे केली होती. त्यावर गंडातर येणार होते. नव्याने संवेदनशील क्षेत्र निश्चित व्हावे यासाठी केंद्रीय पर्यावरणमंत्री प्रकाश जावडेकर यांच्याकडे बैठका झाल्या होत्या. ११ फेब्रुवारी रोजी केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाने अधिसूचना जाहीर केली आहे. यात सोलापूर आणि अहमदनगर जिल्ह्यात सहा तालुक्यांतील क्षेत्राचा समावेश आहे.
सोलापुरातील उद्योजकांनी केलेल्या पाठपुराव्यामुळे संवेदनशील क्षेत्राची निश्चिती झाली आहे. यामुळे उद्योगवाढीला वाव मिळेल, असा विश्वास येथील प्रसिध्द उद्योजक राम रेड्डी यांनी व्यक्त केला.