उत्तर सोलापूर तालुक्यातील विविध गावांत कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे.
बीबीदारफळ, रानमसले, वडाळा, कौठाळी व कळमण या गावांत कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. लसीकरणानंतर कोरोना होत नसल्याची सकारात्मक चर्चा नागरिक करीत आहेत, मात्र लसच शिल्लक नसल्याचे सांगण्यात आले. गटविकास अधिकारी महादेव बेळळे, तालुका वैद्यकीय अधिकारी श्रीकांत कुलकर्णी यांनी वडाळा, मार्डी, नान्नज, बीबीदारफळ या गावांत कोरोना सेंटर सुरू करणे व गावात सर्वेक्षण करण्यासाठी चर्चा केली.
----
पॉझिटिव्ह अन् मृत्यूचे थैमान
बीबीदारफळमध्ये या महिन्यात ३० व्यक्तींचा मृत्यू झाला असून, यामध्ये कोरोनामुळे १२ तसेच हृदयविकार व वृद्धापकाळाने इतर व्यक्ती दगावल्याचे आरोग्य अधिकारी पूजा खराडे यांनी सांगितले. बीबीदारफळमध्ये दोन दिवसांत ४५ व्यक्तींच्या तपासणीत रानमसले व बीबीदारफळचा प्रत्येकी एक व्यक्ती पाॅझिटिव्ह आहे. बीबीदारफळ येथे मार्च महिन्यात १०३ रॅपिड तपासणीत केवळ ५ तर एप्रिल महिन्यात २७८ तपासणीत ११२ जण पाॅझिटिव्ह आले होते.
-----