कुर्डूवाडी : शहरात भुयारी गटारींची कामे सुरू आहेत. त्याचबरोबर अहिल्याबाई होळकर बालोद्यानासाठी एक कोटी रुपायांचा नगर परिषदेला निधी मिळाला आहे. तीन कोटी रुपयांची व्यापारी संकुलाची बांधणीही पूर्ण झाली आहे. शहराच्या विकास कामात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांचे योगदान राहिल्यामुळे कुर्डूवाडीचा कायापालट होत असल्याचे नगराध्यक्ष समीर मुलाणी यांनी नगर परिषदेतील कार्यालयात बाेलावलेल्या पत्रकार परिषदेत सांगितले.
नगर परिषद कार्यालयात शहरातील विविध विकास कामांच्या बाबतीत ते बोलत होते. यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख धनंजय डिकोळे यांच्यासह नगरसेवक उपस्थित होते. ते पुढे म्हणाले, शहरात अनेक विकासकामांनी वेग घेतला आहे.
स्वच्छता अभियान राबविण्यात तर राज्यात उच्चांकी ठरलो आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर प्रशालेसाठी जवळपास एक कोटींची नूतन वास्तू उभारण्यात आली आहे. शहराला पाणीपुरवठा व्यवस्थित व्हावा म्हणून १ कोटी २० लाख रुपयांची अत्याधुनिक फिल्टर योजनाही राबिविली आहे. हे केवळ सेनेच्या वरिष्ठ नेत्यांच्या मदतीमुळे शक्य झाल्याचे त्यांनी सांगितले.
.........
लवकरच नाट्यगृह
कुर्डूवाडी शहर हे सांस्कृतिक शहर आहे. अनेक कलाकार हे राज्यपातळीवर नाव उज्ज्वल करीत आहेत. त्यामुळे येथे मीनाताई ठाकरे नाट्यगृह बांधण्याचा मानस असल्याचे शिवसेनेचे जिल्हाप्रमुख धनंजय डिकोळे यांनी सांगितले. माझी वसुंधरा या योजनेंतर्गत येथील बेंद ओढ्याचे सुशोभीकरण व सौंदर्यीकरण करण्यासाठी पुढे प्रयत्न असणार आहे. त्याचबरोबर भुयारी गटारी पूर्ण होत आहेत. आता येथील रस्त्याच्या कामासाठी नेत्यांकडे निधीची मागणी करणार असल्याचे डिकोळे यांनी सांगितले.
.............
फोटो :
१५ धनंजय डिकोळे
१५ समीर मुलाणी