पंढरपूर/सोलापूर : शिर्डीच्या धर्तीवर पंढरपूरचा विकास शक्य आहे. त्यासाठी पंढरपुरात मास्टन प्लॅन राबविण्यात यावा, मंदिर परिसरातील नागरिकांची जागा ताब्यात घ्या, त्यांना योग्य मोबदला देऊन मंदिराकडे जाणारे रस्ते मोठे व्हावेत यासाठी आराखडा तयार करण्याच्या सुचना केंद्रीय रस्ते, वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी दिल्या.
आषाढी वारीसाठी आळंदी व देहूमधून लाखो भाविक पंढरीच्या वाटेवर असतात. हा भक्तीचा सोहळा महाराष्ट्राचे वैभव असून श्रद्धेचा विषय आहे. लाखो भाविक ज्या मार्गावरून चालत येतात, तो रस्ता भव्य व सुंदर असावा या हेतूने नितीन गडकरी यांनी पालखी मार्गाचे विस्तारीकरण करण्याचे जाहीर केले होते. त्यानुसार या रस्ते कामांचा भूमिपूजन सोहळा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पार पडले. त्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत नितीन गडकरी बोलत होते.
नितीन गडकरी पुढे बोलताना म्हणाले की, पालखी मार्गामुळे पंढरपूरचा विकास आता यापुढे वेगाने होणार आहे. या परिसरातील वाहतूक व्यवस्था सुरळीत होणार असल्याने धार्मिक पर्यटन वाढीसाठी हे रस्ते अत्यंत योग्य ठरणार आहेत असे गडकरी यांनी सांगितले.
पालखी मार्गावरून चालत येणाऱ्या वारकऱ्यांच्या सोयीसाठी रस्त्यावर गवत व स्टाईलस बसविण्यात येणार आहेत, शिवाय प्रकल्पात समावेश नसलेला वाखरी ते पंढरपूर या रस्त्यासाठी ७४ कोटी रुपये मंजूर करण्यात आले असून या मार्गावरील रेल्वे पुलाची सुधारणाही होणार असल्याचे गडकरी यांनी सांगितले.
पंढरपुरात राबवला जावा मास्टर प्लॅन...
मंदिर परिसरातील नागरिकांच्या जागा ताब्यात घेऊन त्यांना योग्य मोबदला द्यावा. मंदिराकडे जाणारे रस्ते मोठे व्हावेत ...