पुळूज (ता. पंढरपूर) येथील आ. यशवंत माने यांच्या फंडातून मंजूर झालेल्या विकास कामाचे भूमिपूजन करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. यावेळी शहीद जीवन मस्के यांच्या सभामंडप व रस्त्यांचे भूमिपूजन करण्यात आले. अध्यक्षस्थानी भीमा सहकारी साखर कारखान्याचे माजी उपाध्यक्ष कल्याणराव पाटील होते.
यावेळी आ. यशवंत माने म्हणाले की, १७ गावातील विकास कामाला माजी आमदार राजन पाटील, विनोद महाडिक, कल्याणराव पाटील यांच्या सल्ल्याने प्राधान्य देण्यात येईल, असे सांगितले. तसेच कोरोना योद्धा म्हणून काम केलेले डॉक्टर, तलाठी, ग्रामविकास अधिकारी, आशा वर्कर, मदतनीस यांचा सत्कार केला. यावेळी अजिंक्यराणा पाटील, कल्याणराव पाटील, विनोद माने यांनी मार्गदर्शन केले.
यावेळी गटविकास अधिकारी रविकिरण घोडके, तुकाराम बंडगर, मुबिना मुलाणी, सरपंच स्वाती शेंडगे, पोलीस पाटील आनंद पाटील, उपसरपंच विनायक पाटील, राजू गावडे, अंबादास बाबर, युवराज शिंदे, धनाजी देशमुख, महेश कांबळे, लिंगा निळगुंडे, शिवाजी लोमटे, संदीप देवकते, अण्णा शेंडगे, नवनाथ खरात, प्रकाश शिंदे, तानाजी होनमाने, बंडू बाबर आदी उपस्थित होते. प्रास्ताविक शिवाजी शेंडगे यांनी केले. सूत्रसंचालन पांडुरंग ताटे यांनी केले. आर. पी. कोळी यांनी आभार मानले.
फोटो ओळी :::::::::::::::::
पुळूज (ता. पंढरपूर) येथे विविध विकास कामांच्या भूमिपूजनप्रसंगी सरपंच स्वाती शेंडगे, शिवाजी शेंडगे यांचा सत्कार करताना आ. यशवंत माने, अजिंक्यराणा पाटील, विनोद महाडिक, कल्याणराव पाटील, रविकिरण घोडके, आर. पी. कोळी आदी.