भाळवणी (ता. पंढरपूर) येथे मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेंतर्गत भाळवणी-शेंडगेवाडी रस्ता डांबरीकरणाचा शुभारंभ आमदार शहाजीबापू पाटील यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी आमदार प्रशांत परिचारक होते. यावेळी आमदार परिचारक यांनी पुढील ३० वर्षांनंतर वाढणारी लोकसंख्या विचारात घेऊन प्रत्येक ग्रामपंचायतीने रस्ते, वीज, ड्रेनेज व पाणीपुरवठा या मूलभूत सुविधांच्या विकास आराखड्याचे नियोजन करून विकासकामे राबविणे गरजेचे असल्याचे सांगितले.
यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख संभाजी शिंदे, तानाजी वाघमोडे, समाधान काळे, जि.प. सदस्य शोभा वाघमोडे, जिल्हा नियोजन समिती सदस्य महेश साठे, भगवान चौगुले, हरिभाऊ शिंदे, दीपक गवळी, बाळासाहेब यलमर, गंगाराम विभुते, सरपंच विठ्ठल चौगुले, उपसरपंच पूनम गवळी, आबासो शेंडगे, अनिल माने, प्रवीण शिंदे, धोंडीराम शिंदे, ग्रामपंचायत सदस्य नितीन शिंदे आदी उपस्थित होते.