सोलापूर : देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दल मला वाटतं. राज्यात १०५ आमदार निवडून आणूनही भाजपने त्यांना मुख्यमंत्रीपद नाकारलं. त्यांना उपमुख्यमंत्री केलं. आता आणखी एक उपमुख्यमंत्री आणून बसवला. ते माझे भाऊ आहेत. माझ्या भावाचा अपमान करू, असा टोला राष्ट्रवादी काँग्रेसच्या (शरद पवार गट) खासदार सुप्रिया सुळे यांनी रविवारी लगावला.
शरद पवार गटाच्यावतीने शहरातील हैदराबाद रोडवर अल्पसंख्याक कार्यकर्त्यांचा मेळावा झाला. यावेळी त्या बोलत होत्या. खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या, देवेंद्र फडणवीस सर्वच मेरीटवर पास झाले. त्यांना १० पैकी १० गुण मिळायला हवे. पण भाजपने त्यांना उपमुख्यमंत्री करुन पाच गुणांवर आणले. आणखी एक उपमुख्यमंत्री आणून अडीच गुणांवर आणले. त्यांच्या मुख्यमंत्री आणि गृहमंत्रीपदाच्या काळात नागपूरमध्ये गुंडगिरी वाढली.
देवेंद्र फडणवीस यांच्याकडून चूक झाली असेल पण त्यांच्यावर अन्याय करायला नको होता. भाजपकडून मराठी माणसांवर नेहमी अन्याय केला जातो. कर्नाटकात येडीयुरप्पा हे चांगले नेते आहेत. पण भाजपने त्यांचे खच्चीकरण केले. त्यांना घरी बसविले. त्यामुळेच भाजपचा पराभव झाला, असेही सुप्रिया सुळे म्हणाल्या.