तंबाखूमुक्त शाळेसाठी सलाम फाउंडेशनच्या जिल्हा समन्वयक शुभांगी लाड, केंद्रप्रमुख धनाजी जाधवर यांनी प्रत्यक्ष शाळांना भेट देऊन मार्गदर्शन केले. आपल्या केंद्रातील सर्व शाळा तंबाखूमुक्त करण्यासाठी सातत्याने पाठपुरावा केला. त्यासाठी सर्व शाळेतील मुख्याध्यापक आणि शिक्षकांनी सहकार्य केले म्हणून हे यश मिळवता आल्याचे केंद्रप्रमुख धनाजी जाधवर यांनी सांगितले. यासाठी विलास लंगोटे, तानाजी पवार, जयश्री शेळवणे, विश्वनाथ ढाणे, अमोल मोहिते यांनी परिश्रम घेतले.
हे होते ते नऊ निकष
शाळेच्या आवारात तंबाखू मुक्त परिसर म्हणून मोठा फलक लावणे, तंबाखू मुक्त शैक्षणिक संस्थेत १०० मीटर परिसरात सिगारेट व इतर तंबाखूजन्य पदार्थ विक्रीवर बंदी, शाळेच्या परिसरात अशा पदार्थांची विक्री न करणे, आवारात बिडी किंवा सिगारेटचे तुकडे किंवा रिकामे पाऊच आढळून आले नाही पाहिजेत, भिंतीवर थुंकणे याला प्रतिबंध असणे असे दिसून आल्यास दंड आकारणे. तंबाखूच्या दुष्परिणामावर आधारित पोस्टर किंवा साहित्य शाळेत विद्यार्थ्यांना दिले पाहिजे. शाळेत महिन्यात किमान एक तरी तंबाखू नियंत्रणावर आधारित कार्यक्रम आयोजित करणे. या अनुषंगाने गावात प्रभार फेरी काढणे, जागतिक कर्करोग दिन, तंबाखू विरोधी दिन साजरा करणे, रांगोळी स्पर्धा आयोजित करणे, राष्ट्रीय सणाच्या दिवशी तंबाखूमुक्तीची शपथ देणे, तंबाखूमुक्ती मॉनिटर नियुक्त करणे, शाळेच्या परिसरात तंबाखूचा वापर होणार नाही याविषयी आचारसंहिता तयार करणे, शाळा परिसरात तंबाखूजन्य पदार्थ विक्रीचे दुकान नसणे या नऊ अटी पूर्ण करणाऱ्या शाळांचा तंबाखूमुक्त शाळा म्हणून गौरव केला आहे.
या आहेत त्या शाळा अन् मुख्याध्यापक
देवगाव नागनाथ चोबे, मांजरे वस्ती रामलिंग जगदाळे, पांढरी वस्ती सुरेश व्हळे, कांदलगाव अंद्रिया रणदिवे, गाडेगाव ओंकारेश्वर सालसकर, खडकलगाव चंद्रकांत मिरगणे, धस पिंपळगाव महेश बरचे, पवार वस्ती दत्तात्रय पाटील, लक्ष्याचीवाडी माया कोरे, शेलगाव व्हळे शारदा कोंढारे, नागोबाची वाडी विवेकानंद जगदाळे.
फोटो
१४बार्शी-टिचर
ओळी
तंबाखूमुक्त झालेल्या देवगाव केंद्रातील शाळांना तंबाखूमुक्त शाळेचे डिजिटल प्रमाणपत्र वाटपप्रसंगी केंद्रप्रमुख धनाजी जाधवर.