- प्रभू पुजारीपंढरपूर (जि. सोलापूर) :‘जाहला भक्तीचा जागर।पंढरीत अवतरला वैष्णवांचा महासागर।।’‘ज्ञानोबा-तुकाराम’, ‘बोला पुंडलिक वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ महाराज की जय़़़’ असा जयघोष करीत भक्तिमय वातावरणात संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊली, जगद्गुरू तुकाराम महाराज यांच्यासह शेकडो पालख्या अन् दिंड्या रविवारी पंढरीत दाखल झाल्या़ तब्बल १२ लाखांपेक्षा जास्त भाविक सध्या पंढरीत असून सोमवारी ही संख्या १४ लाखांपर्यंत जाईल, असा अंदाज प्रशासनाच्यावतीने व्यक्त करण्यात आला आहे.पंढरपूरजवळील वाखरी मुक्कामी असलेले पालखी सोहळे रविवारी दुपारी पंढरीच्या दिशेने मार्गस्थ झाले़इसबावी, केबीपी कॉलेज, सरगम चौक, इंदिरा गांधी चौक, अर्बन बँकमार्गे पालखी सोहळे आपापल्या मठात जाऊन विसावले़ टाळ-मृदंगांचा गजराने पंढरीचा पालखी मार्ग दुमदुमून गेला होता. पददर्शन रांग रविवारी सकाळीच गोपाळपूरच्या पुढे गेली होती़ मंदिरापासून ही रांग १० किलोमीटरपर्यंत गेली होती़ त्यामुळे आता पददर्शनासाठी किमान २२ तासांपेक्षा जास्त वेळ लागत आहे़
भाविकांनी दुमदुमली पंढरी!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 23, 2018 1:43 AM