सोलापूर : नऊ दिवस देवीचा जागर करत असताना तुळजापूरहून पेटलेली ज्योत आणून ती तेवत ठेवण्याची परंपरा तरुण भक्तांमध्ये आहे. पहिल्या माळेच्या आदल्या दिवसी सातारा, विजायपूरमधील काही तरुण भक्त शनिवारी सकाळी तुळजापुरात पोहोचले. 'आई राजा उदो..उदो..'च्या गजरात पेटलेली ज्योत घेऊन निघाले. दुपारी सोलापुरात ग्रामदेवी रुपावानीचे दर्शन घेत तेवढीच ऊर्जा साठवून गावच्या दिशेने धावले. या देवीभक्तांना सोलापूरकरांनी रस्ता मोकळा करुन दिला.कुलस्वामिनी तुळजाभवानी देवी ही महाराष्ट्रातील देवीच्या साडेतीन पीठांपैकी एक असल्याची भाविकांची श्रद्धा आहे. महाराष्ट्रातील हिंदू भाविकांमध्ये या देवीस विशेष महत्त्व असून नवरात्रात येथे मोठा उत्सव व भक्तांची गर्दी होते. नवरात्र महोत्सवात भवानीमातेचे भक्त मनोभावे देवीची ज्योत पेटवून नेतात. नवरात्रीत ही ज्योत कुलस्वामीनीपासून नेण्याची परंपरा आहे. यंदा महाराष्ट्र आणि कर्नाटकाच्या कानाकोप-यातून भक्तगण धावत आले.साताऱ्यात भक्त २७० अन् विजयपूरचे १५० किमी धावलेसोलापूर- तुळजापूर या जवळपास ४४ किलो मीटर रस्त्याच्या बाजुला सर्व्हीस रोड देवीभक्तांसाठी मोकळा करुन दिला. ज्योत घेऊन धावणा-या भक्तांच्या पाठीमागे काही तरुण दुचाकी घेऊन निघाले. शुक्रवारी सायंकाळी साता-यातून दुचाकीवर निघालेले तरुण भक्त शनिवारी सकाळी तुळजापुरात पोहोचले. दुपारी दीड वाजेदरम्यान हे भक्त सोलापूर शहराचे प्रवेशद्वार रुपाभवानी दवी चौकात ज्योत घेऊन धावत आले. देवीचे दर्शन घेऊन ते २७० तर विजयपूर जवळील कन्नूरचे ५५ तरुण १५० किलो मीटर दौडत निघाले.
सातारा, विजयपूरचे भक्त तुळजापूरमधून धावले; ज्योत घेऊन सोलापूरच्या ग्रामदेवीपुढे विसावले
By काशिनाथ वाघमारे | Published: October 14, 2023 4:42 PM