राजकुमार सारोळे
सोलापूर : देशभरातील सहा हजार युवतीमधून माढा तालुक्यातील अकोले (खुर्द) येथील धनश्री धन्यकुमार गोडसे हिने मिस इंडिया हा किताब मिळविला आहे. जुलै महिन्यात इंडोनिशीयामध्ये होणाºया मिस इंटरनॅशल स्पर्धेसाठी तिची निवड झाली आहे.
धनश्री ही सांगलीच्या भारती विद्यापीठामध्ये एमबीबीएसच्या दुसºया वर्षाचे शिक्षण घेत आहे. तिचे वडील धन्यकुमार हे पोलीस निरीक्षक तर आई राजश्री या डॉक्टर आहेत. ३0 जानेवारी ते २ फेब्रुवारीदरम्यान जयपूर येथे मिस इंडिया २0१९ ही स्पर्धा झाली. या स्पर्धेसाठी देशभरातून सहा हजार युवती आल्या होत्या. यामध्ये धनश्री ही आॅडिशन द्यायची म्हणून उत्सुकतेने गेली होती. यावेळी उंची, शरीरयष्ठी आणि बौद्धिक चाचणी घेण्यात आली. यातून या स्पर्धेसाठी निवड झाल्यावर जयपूरमध्येच तिने सात दिवस प्रशिक्षण घेतले. यामध्ये हिल्सच्या सॅन्डल घालून चालण्यापासून विविध पोज कशा घ्यायच्या याचा सराव करण्यात आला.
ही स्पर्धा केवळ सौंदर्यापुरतीच मर्यादीत नव्हती तर आत्मविश्वास, बुद्धीमत्ता, हजरजबाबीपणा, प्रश्नांचे उत्तर देण्याची क्षमता, धाडस, वागणे, बोलणे आणि व्यक्तीमत्वाचा विचार करण्यात आला. त्यानंतर देशभरातून सहभागी झालेल्या निवडक २७ युवतींबरोबर विविध राऊंड झाले. प्रत्येक राऊंडमध्ये गुणांकन वाढत गेला. धनश्री हिच्या वाढदिवसादिवशीच म्हणजे २ फेब्रुवारी रोजी अंतिम निकाल जाहीर झाला अन त्यात तिची निवड झाल्याचे जाहीर करण्यात आले. केवळ आॅडिशन द्यायला गेलेली धनश्री मिस इंडिया हा किताब घेऊन आल्याबद्दल घरच्यांना आनंद झाला.
मिस इंडिया ठरलेली स्पर्धक मिस युनिव्हर्स, मिस वर्ल्ड व मिस इंटरनॅशनल अशा तीन वेगवेगळ्या स्पर्धांतून प्रतिनिधीत्व करीत असते. आता पुढील टप्प्पात जुलै महिन्यात इंडोनिशीयात होणाºया मिस इंटरनॅशनल स्पर्धेत धनश्री ही भारताचे प्रतिनिधीत्व करणार आहे. या स्पर्धेनंतर तिला चित्रपटांसाठी बोलाविण्यात आले पण तिने एमबीबीएसमध्ये शिक्षण पूर्ण करण्यासाठी नकार दिला. डॉक्टर होण्याचे लहानपणापासून स्वप्न असल्याने आधी शिक्षणाला प्राधान्य नंतर अभिनय पाहिण असे तिने सांगितले.
धनश्रीच्या कलागुणांना चालनामी पोलीस निरीक्षक असल्याने सतत बदल्या झाल्या. त्यामुळे बदलीच्या ठिकाणी ९ वेळा धनश्रीच शिक्षण बदलत गेलं. अशाही स्थितीत तिने आपल्यातील क्षमता ओळखून आत्मविश्वासाने मिस इंडिया हा किताब पटकाविला. तिच्या कलागुणांना चालना देणार असल्याचे धन्यकुमार गोडसे यांनी सांगितले.
मिस इंडिया स्पर्धेसाठी कोणतही प्रशिक्षण घेतलं नाही. आत्मविश्वास व वाचन यामुळे मला यश मिळाले. मनात पॅशन असेल तर कोणतीही गोष्ट अशक्य नाही-धनश्री गोडसे