मोहोळ : धनगर समाजाला अनुसूचित जमातीमध्ये (एसटी) आरक्षण देण्याच्या मागणीसाठी आॅल इंडिया धनगर समाज महासंघाच्या वतीने जिल्हाध्यक्ष अनंता नागणकेरी यांच्या नेतृत्वाखाली मोहोळ तहसील कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. या मोर्चानंतर जाहीर सभेत रुपांतर झाले, यावेळी आरक्षण मिळेपर्यंत संघर्ष करण्याचा इशारा देण्यात आला. गेल्या अनेक वर्षांपासून धनगर समाजाचा अनुसूचित जमातीमध्ये समावेश करावा, अशी मागणी करण्यात येत आहे, मात्र या मागणीकडे शासनाने दुर्लक्ष केलेले आहे. केवळ धनगर समाजाचा मतांसाठी वापर करण्यात आला. परंतु आता यापुढील काळात आम्ही गप्प बसणार नाही. जोपर्यंत समाजाला आरक्षण जाहीर होत नाही तोपर्यंत आम्ही संघर्ष करणार असल्याचा इशारा सोलापूरचे माजी नगरसेवक सुनील खटके यांनी दिला. यावेळी तालुकाध्यक्ष तात्यासाहेब पाटील, भाजयुमोचे माजी अध्यक्ष संजय क्षीरसागर, शहराध्यक्ष रावसाहेब चोरमले, पंढरपूरचे माजी सभापती वामनराव माने, सुनीश शिंदे, विक्रम चेंडगे, विलास ढेरे, नवनाथ गाढवे, नागनाथ वाघमोडे, बापू कमले, दिनेश घागरे, भुजंग मुलगे, भैय्या जानकर, संपत घाडगे, संतोष वाकडे, बिरुदेव घोडके, माणिक गावडे आदी उपस्थित होते. आभार प्रा. चंद्रकांत देवकते यांनी मानले. तहसीलदार सदाशिव पडदुणे यांनी आंदोलकांशी चर्चा करून निवेदन स्विकारले़महासंघाच्या मागण्या शासनाला कळविण्याची ग्वाही त्यांनी दिली़
---------------------------
- या आहेत मागण्या
धनगर समाजाचा एसटीमध्ये समावेश करावा पोखरापूर येथील धनाजी विठोबा देवस्थानास तीर्थक्षेत्राचा दर्जा द्यावा तालुक्यातील गारपीटग्रस्तांचे उर्वरित पंचनामे करावे सोलापूर विद्यापीठाला अहिल्यादेवीचे नाव द्यावे -