कोरोना महामारी व मंदीचे सावट असतानाही पांडुरंग, राजाभाऊ, कृष्णदेव व विष्णू या ढेकळे बंधुंनी सहा एकर द्राक्षबाग केली. अतिशय कष्टाने प्रत्येक नैसर्गिक आपत्तीला सामोरे जाऊन ती जोपासली, पण सतत पडणाऱ्या पावसामुळे सहापैकी चार एकर फळबाग पूर्णपणे वाया गेली. दोन एकर चांगली आली. त्याच बागेला आम्ही सर्व कुटुंब हे वर्षभर योग्य मार्गदर्शन घेऊन जोपासली. चांगल्या प्रतीचा मालही आला. त्यामुळे ५० रुपये प्रतिकिलोप्रमाणे नाशिक येथील व्यापारी चंदू शेठ व मोडनिंब येथील चंद्रकांत मोरे यांना दिली. मागील वर्षीप्रमाणे यंदाही लॉकडाऊन असल्याने आता काय होणार, अशी चिंता वाटू लागली होती. परंतु, चांगल्या प्रतीचा माल असल्यामुळे या व्यापाऱ्यांनी तो पंजाब येथील जालंदर येथे पाठवण्याचा निर्णय घेतला. सध्या तो माल बागेतून काढून पॅकिंग जागेवरच करू टेम्पोद्वारे पाठवला जात आहे. दोन एकरात ४० टन माल निघेल, अशी अपेक्षा विष्णू ढेकळे यांनी व्यक्त केली.
कोट ::::::::
ढेकळेवाडी येथील ढेकळे बंधुंची द्राक्ष गुणवत्ता चांगली असल्यामुळे व द्राक्ष घडातील मणी एक-दोन दिवस मार्केटमध्ये जायला उशीर झाला तरी ते मणी गळून पडत नसल्यामुळे हा वाण व्यापारी व ग्राहकांसाठी चांगला आहे.
- चंद्रकांत मोरे,
द्राक्ष व्यापारी
फोटो
१०मोडनिंब०१
ढेकळेवाडी ता. माढा येथील चार बंधुंनी जोपासलेली हीच ती द्राक्ष बाग.