पटवर्धन कुरोली (ता. पंढरपूर) येथे ऊस वाहतूक दर यांच्या प्रश्नासंबंधी जनशक्ती संघटनेची बैठक पार पडली. यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी किसान युवा क्रांतीचे प्रतापसिंह चंदनकर, गणेश वायभासे, रोहन नाईकनवरे, रामभाऊ खटके, अंकुश उपाळे, सागर पाटील, सोमनाथ जाधव, प्रकाश पवार आदी उपस्थित होते. पुढे बोलताना खुपसे पाटील म्हणाले की, २०१५-१६ साली डिझेलचे दर ६५ रुपये प्रति लिटर होते. आज ते १०० च्या घरात पोहोचले आहे. ड्रायव्हरचा पगार ६ हजार होता तो १५ हजारच्या पुढे झाला आहे आणि टायर यांच्या किमतीदेखील वाढल्या आहेत. मात्र, ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टर व ट्रकचे कारखानदारांनी वाहतूकदर आणी कमिशन आजही वाढवलेले नाही. हजारो ऊस वाहतूकदार अडचणीत सापडले आहेत. त्यामुळे वेळीच एकत्र होऊन कारखानदारांच्या विरोधात हक्कासाठी लढा दिला पाहिजे, असेही ते म्हणाले.
यावेळी राजाभाऊ भिले, तानाजी जाधव, सुनील टिक, बिभीषण गमे, अनिल पाटील, सचिन शिंगटे, नितीन तकिक, गोपाळ पाटील, ज्योतिराम शिंदे, राजेंद्र जांबरे, ज्योतिराम ढोबळे, भाऊसाहेब गायकवाड, श्रीकांत नागणे, बालाजी पांढरे, विशाल माने, शिवाजी वळेकर, पोपट केचे, बंटी गायकवाड, कविराज मोहिते, सचिन गायकवाड, गणेश ढोबळे, राणा वाघमारे यांच्यासह इतर वाहन चालक, मालक उपस्थित होते.
........
२१ सप्टेंबर रोजी ट्रॅक्टर आंदोलन
गेल्या अनेक वर्षांपासून ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टर व ट्रक मालकांचे वाहतूकदार आणी कमिशन वाढवले नाहीच, शिवाय त्यांच्यावर जप्तीसारख्या कारवाया कारखानदारांकडून केल्या जातात. म्हणून आपल्या मागण्या कारखानदार व शासन दरबारी पोहोचविण्यासाठी २१ सप्टेंबर रोजी पंढरपूरमध्ये जनशक्ती संघटनेचे ट्रॅक्टर आंदोलन होणार असल्याचे अतुल खुपसे पाटील यांनी सांगितले.
सोबत फोटो मेल केले आहेत.