सोलापूर : महसूल विभागाचे कामकाज पेपरलेस होत असून, जिल्ह्यातील ३४ लाख नागरिकांनी वर्षभरात ३४ लाख ७८ हजार डिजिटल उतारे काढले आहेत. डिजिटल उतारे काढण्याची प्रक्रिया अत्यंत सोपी असून, त्यासाठी फक्त पंधरा रुपयांचा खर्च नियोजित आहे. त्यामुळे डिजिटल उतारे काढण्याचे प्रमाण वाढले आहे.
महसूल विभागाचे कामकाज शंभर टक्के पेपरलेसच्या मार्गावर आहे. राज्य शासनाने २०१५ मध्ये सर्व उतारे डिजिटल करण्याचा निर्णय घेतला. २९ मार्चअखेर जिल्ह्यातील नागरिकांनी ३४ लाख ७८ हजार ४०३ दस्तऐवज ऑनलाईनरित्या काढून घेतले आहेत. त्यात सात-बारा उतारे २० लाख ८९ हजार ९२३ नागरिकांनी, ८ अ उतारे १० लाख ४६ हजार ७५२, फेरफार दाखले ३ लाख ४१ हजार ७२८ नागरिकांनी काढले आहेत.
----------
उतारे काढणारे तालुकानिहाय...
- - पंढरपूर - ४ लाख ७७ हजार ४२८
- - करमाळा - २ लाख १७ हजार ५७७,
- दक्षिण सोलापूर - २ लाख ९ हजार ४२०,
- अक्कलकोट - २ लाख ६८ हजार ६०४,
- माढा - ३ लाख ८४ हजार ५८०,
- बार्शी - ४ लाख ७६ हजार ६०८,
- उत्तर सोलापूर - १ लाख २१ हजार ८०७,
- मोहोळ - ४ लाख ३ हजार ७३५,
- पंढरपूर - ४ लाख ७७ हजार ४४८,
- माळशिरस -३ लाख ११ हजार ६९५,
- सांगोला - ३ लाख ९५ हजार ५०१,
- मंगळवेढा - २ लाख ११ हजार ५४८