शहरं
Join us  
Trending Stories
1
अंबाबाईच्या चरणी १ कोटी ८४ लाखांचे दान; कोल्हापुरच्या देवस्थान समितीकडून मोजणी
2
आतिशी यांच्या शपथविधीसाठी आलेले हे IAS अधिकारी कोण? जे केजरीवाल बोलत असताना हात जोडून उभे होते
3
Bigg Boss Marathi फेम अभिनेत्रीचं क्रॉप टॉप अन् डेनिम शॉर्ट्समध्ये बोल्ड फोटोशूट (Photos)
4
महाविकास आघाडीत कोणतीही बिघाडी होणार नाही; खासदार निलेश लंके यांना आत्मविश्वास
5
पुण्याहून लातूरकडे निघालेली भरधाव ट्रॅव्हल्स उलटली; गाढ झाेपेत असलेले ५ प्रवासी जखमी!
6
रिपाइं आठवले गटाचे उल्हासनगर शहर जिल्हाध्यक्ष भगवान भालेराव यांची पक्षातून हकालपट्टी
7
धक्कादायक! उल्हासनगरातील अपंग शासकीय बालगृहातून २ गतिमंद व कर्णबधीर मुले गायब
8
तुळजापुरातील बसस्टँडवर ओळख; लातूरमध्ये अत्याचार! संशयित शिक्षकासह तिघांविरुद्ध गुन्हा
9
वाळवा, शिराळा, पलूस, तासगाव तालुक्यासह सांगली जिल्ह्यात पुन्हा जोरदार पाऊस
10
उजनी परिसराला पावसाने झाेडपले; वाहतूक ठप्प! एकंबी, मासुर्डी रस्ता गेला पाण्याखाली
11
थरकाप उडवणारी घटना...! आता दुसरी 'श्रद्धा वालकर'...! फ्रिजमध्ये आढळले 29 वर्षांच्या तरुणीचे 30 तुकडे 
12
IND vs BAN 1st Test : चेन्नईच्या मैदानावर विराटचा जल्लोष, शाकिब आउट झाल्यानंतर केला सुपर डान्स! बघा Video
13
VIDEO: मराठमोळ्या ऋतुराज गायकवाडने घेतला 'सुपरमॅन' कॅच; हवेत उडी घेऊन टिपला झेल
14
हमीभावापेक्षा अधिक दराने कापूस, सोयाबीनची खरेदी होणार- देवेंद्र फडणवीसांनी दिलं वचन
15
“शिंदे, फडणवीस सर्वांसमोर उमेदवार देऊ, २८८ जागा लढू, राज्यात महाशक्तीचा CM दिसेल”: बच्चू कडू
16
“अमूल तूप कधीही तिरुपतीला पाठवलेले नाही”; लाडू प्रसाद वादावर कंपनीने दिले स्पष्टीकरण
17
आतिशी दिल्लीच्या मुख्यमंत्री बनल्या, पण सरकार चालवण्यासाठी असतील मोठी आव्हाने!
18
IND vs BAN : पंत OUT होणार असं समजून राहुलची तयारी पण फजिती; सिराजला पिकला हशा, Video
19
₹600 कोटींची ऑर्डर मिळताच शेअरच्या खरेदीसाठी उडाली गुंतवणूकदारांची झुंबड, 14% नं वधारला भाव
20
PM मोदी - मुहम्मद युनूस यांच्यात अमेरिकेत बैठक नाही, बांगलादेशने पुढे केलं 'हे' कारण

पदवी अभ्यासक्रमासाठी आता थेट विद्यापीठात मिळणार प्रवेश!

By संताजी शिंदे | Published: May 24, 2024 6:47 PM

नवीन शैक्षणिक धोरणानुसार पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ प्रशासनाने नव्याने काही अभ्यासक्रम यंदाच्या शैक्षणिक वर्षापासून सुरू करण्याचा निर्णय घेतलेला आहे.

सोलापूर : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठात यंदाच्या २०२४-२५ शैक्षणिक वर्षापासून पदवीचे अभ्यासक्रम सुरू करण्याचा निर्णय कुलगुरू प्रा. प्रकाश महानवर यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यापीठ प्रशासनाने घेतला आहे. या अंतर्गत आता विद्यापीठ संकुलात बीएससी, बीकॉम प्रोफेशनल, बीबीए, बीसीए आणि बिलीब अभ्यासक्रम सुरू होणार असल्याची माहिती प्र-कुलगुरू प्रा. लक्ष्मीकांत दामा यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत दिली.

नवीन शैक्षणिक धोरणानुसार पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ प्रशासनाने नव्याने काही अभ्यासक्रम यंदाच्या शैक्षणिक वर्षापासून सुरू करण्याचा निर्णय घेतलेला आहे. त्यानुसार आता प्रवेश प्रक्रिया सुरू आहे. या अंतर्गतच विद्यापीठ संकुलात बारावीनंतर विद्यार्थ्यांना आता पदवीचे शिक्षण घेण्याची सुवर्णसंधी मिळणार आहे. विद्यापीठाच्या इतिहासात हे प्रथमच झाले असून त्या संदर्भाची संपूर्ण तयारी विद्यापीठ प्रशासनाकडून सध्या सुरू आहे. पदवीच्या या अभ्यासक्रमांसाठी स्वतंत्र अभ्यासक्रम तयार करण्यात आला आहे. या अभ्यासक्रमांसाठी प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांकरिता तज्ञ मार्गदर्शक, अद्यावत सोयी सुविधा, सुसज्ज ग्रंथालय, क्रीडांगणे, लॅबोरेटरीज, इमारत आदी पायाभूत सुविधा तसेच विद्यार्थ्यांना निवासासाठी वस्तीगृहाची देखील सोय राहणार आहे.

बीएससी पदवी अभ्यासक्रमांसाठी या विषयांची उपलब्धताबारावी सायन्स उत्तीर्ण विद्यार्थ्यांना पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर बीएससी पदवीसाठी थेट प्रवेश घेता येणार आहे. याकरिता मॅथेमॅटिक्स, स्टॅटटिक्स कॉम्प्युटर सायन्स, जिओलॉजी, एनवोर्मेन्ट सायन्स,  बायोटेक्नॉलॉजी, मायक्रोबायोलॉजी, पॉलिमर टेक्नॉलॉजी, फाईन अँड बल्क केमिकल टेक्नॉलॉजी, फार्मासिटिकल टेक्नॉलॉजी, सरफेस कोटिंग टेक्नॉलॉजी, फिजिक्स, इलेक्ट्रॉनिक्स सायन्स, बॉटनी, झूलॉजी आणि डेटा सायन्स यापैकी विद्यार्थ्यांना आपल्या आवडीचे  विषय निवडता येणार आहे.

टॅग्स :Solapurसोलापूर