सोलापूर : जिल्ह्यातील विकास कामांचा आढावा घेण्यासाठी सोलापूर दौºयावर आलेल्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी काँग्रेस भवन कार्यालयात निर्देशने केली. सकाळी निर्देशने करण्यासाठी जमलेल्या कार्यकर्त्यांना पोलीसांनी रोखले होते. त्यावेळी पोलीसांनी कार्यकर्त्यांना दुपारी २ नंतर भेट घालून देण्यात येईल असे सांगितले, मात्र त्यानंतरही काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी काँग्रेस भवन कार्यालयात अखेर निर्देशने करून आपल्या तीव्र भावना व्यक्त केल्या.
मराठा, धनगर, मुस्लिम व कोळी समाजास तात्काळ आरक्षण मिळावे, सोलापूर जिल्हा दुष्काळग्रस्त जाहीर करून शेतकºयांना मदत करावी, घरपोच दारू विकण्याचे निर्णय तात्काळ मागे घ्यावे, सोलापूर महापालिकेमध्ये तात्काळ झोन समिती व्हावी, सोलापूरला दुहेरी पाईपलाईन मंजूर झाली असून त्यामध्ये राज्य सरकारचा सहभाग म्हणून आपण ती योजना अधिक व्यापक करण्यासाठी राज्य सरकारकडून आर्थिक सहाय्य करावे या मागण्यांचे निवेदन मुख्यमंत्र्यांना देणार असल्याचे युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष अंबादास करगुळे यांनी सांगितले.
यावेळी नगरसेवक विनोद भोसले, सरचिटणीस राजासाहब शेख, मिडियासेल अध्यक्ष तिरूपती परकीपंडला, युवक अध्यक्ष श्हर दक्षिण सैफन शेख, युवक अध्यक्ष उत्तर विवेक कन्ना, युवक अध्यक्ष शहर मध्य योगेश मार्गम, सचिव राहुल गोयल, प्रविण जाधव, सुभाष वाघमारे, गणेश गायकवाड, सुदीप चाकोते आदी उपस्थित होते.