यासाठी विद्यार्थ्यांना ऑनलाइन रजिस्ट्रेशन करणे अत्यावश्यक आहे. त्यादृष्टीने डीटीईने दिलेल्या माहितीनुसार नियमित शुल्कासह अर्जाची ऑनलाइन नोंदणी करण्यासाठी १३ जुलै ते ४ ऑगस्ट असा कालावधी दिला आहे.
या कालावधीत विद्यार्थी प्रवेश प्रक्रियेसाठी तंत्रशिक्षण मंडळाच्या संकेतस्थळावरून अर्ज छाननीची योग्य पद्धत निवडून ऑनलाइन नोंदणी करणे, कागदपत्रांच्या स्कॅन छायाप्रती अपलोड करणे, कागदपत्रांची पडताळणी करून अर्ज निश्चित करू शकतात. विद्यार्थ्यांकडून हे ऑनलाइन प्रवेश अर्ज भरताना बऱ्याचदा चुका होतात. त्यादृष्टीने सुविधा केंद्रामध्ये मोफत ऑनलाइन अर्ज भरण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. यासाठी विद्यार्थ्यांनी प्रवर्गाची कागदपत्रे, आधार कार्ड, फोटो घेऊन सुविधा केंद्रास भेट द्यावी, असे आवाहन अध्यक्ष बाबूराव गायकवाड यांनी केले आहे. प्रवेशासंबंधी अधिक माहितीसाठी समन्वयक ए.बी. भोसले यांच्याशी संपर्क साधावा, असे प्राचार्य डॉ. आर.ए. देशमुख यांनी सांगितले.