: लसीकरणाच्या प्रतीक्षेत असलेल्या नागरिकांना आणि तरुणवर्गाला रविवारी
'बुकिंग फुल्ल' या संदेशाने निराशेचा सामना करावा लागला. अवघ्या २०
मिनिटांत लस घेण्याच्या नोंदी बंद झाल्याने इच्छुकांचा हिरमोड झाला.
त्याचं झालं असं, सोमवारी १८ वर्षांच्या वरील नागरिकांना लस देण्यासाठी
जिल्ह्यातील केंद्रांवर नोंदणी करण्यास सांगण्यात आले. त्यासाठी
जिल्ह्यातील मोजक्याच केंद्रावर ही लस उपलब्ध करण्यात येणार होती अनेक जण मोबाइलवरून लसीकरणाच्या नोंदीसाठी सरसावले. रविवारी सायंकाळी ७ वाजता ऑनलाइन नोंदणी सुरू झाली. अवघ्या १५ मिनिटांत जिल्ह्यातील सर्वच केंद्रांत 'बुकिंग फुल्ल' झाल्याचे दिसून आले. सोमवारी सोलापूर
जिल्ह्यातील २७ केंद्रांतून १८ वर्षांच्या पुढील नागरिकांना लस देण्याची
व्यवस्था करण्यात आली होती. मात्र, अवघ्या २० मिनिटांच्या आत जिल्ह्यातील
सर्वच केंद्रांतील नोंदणी पूर्ण झाली. रात्री उशिरापर्यंत लसीकरणाच्या
नोंदणीसाठी नागरिकांची धडपड सुरू होती. परंतु बुकिंग फुल्ल या लाल रंगाच्या सिग्नलने सर्वांचीच निराशा झाली.
----