नदीकाठावरील गावच्या शेतक-यांनी व नागरिकांनी सावधानता बाळगावी, असे आवाहन माचणूर येथील भीमा पाटबंधारे शाखा क्र.२ चे शाखा अभियंता सिध्देश्वर पाटील यांनी केले आहे. वीर धरणातून ६ हजार ७६३ क्युसेस पाणी सोडण्यात आले आहे. हे पाणी माचणूर येथील भीमा नदीपात्रात मिसळत असल्याने पूर्वीचे व येणारे पाणी असा एकूण विसर्ग ७ हजार ८०० क्युसेस वाहणार असल्याने उचेठाण, बठाण, ब्रह्मपुरी, माचणूर, रहाटेवाडी, तामदर्डी, बोराळे, नंदूर, सिध्दापूर, अरळी या नदीकाठावरील गावातील शेतकऱ्यांनी पाणी उपसा करणाऱ्या पंपाबाबत काळजी घ्यावी, असे आवाहन भीमा पाटबंधारे विभागाकडून करण्यात आले आहे. याप्रसंगी बठाण, उचेठाण, माचणूर, वडापूर, अरळी येथील को.प. बंधाऱ्याला पाण्याचा धोका होऊ नये याची खबरदारी घेत दारे काढण्यात आली असल्याचे सांगण्यात आले.
-----------