सोलापूर : कुंभार समाजाला मातीवरील माफ केलेल्या रॉयल्टीच्या धर्तीवर वडार समाजाला दगड खाणीवर रॉयल्टी माफ करण्याचा सकारात्मक विचार करण्यात येईल, असे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी वडार समाज संघटनेसोबतच्या बैठकीत मुंबईत आश्वासन दिले.आमदार प्रणिती शिंदे यांनी वडार समाज संघटनेची व महसूल मंत्र्यांची बैठक लावली होती. या बैठकीला जिल्हाधिकारी डॉ. प्रवीण गेडाम, आमदार प्रणिती शिंदे, रुपाभवानी खाण मोटारमालक संघटनेचे लक्ष्मण विटकर, लेबर फेडरेशनचे माजी उपाध्यक्ष शंकर चौगुले, अनिल धोत्रे, राजू चौगुले, विजय मंठाळकर, शंकर बाबुराव चौगुले, तुकाराम चौगुले, विष्णू मुधोळकर व महसूल खात्याचे सचिव, उपसचिव उपस्थित होते. कुंभार समाजासाठी मातीला रॉयल्टी आकारली जात नाही. त्याच धर्तीवर वडार समाजालाही दगड उत्खननावरील रॉयल्टी माफ करण्याची मागणी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी महसूल मंत्री थोरात यांच्याकडे केली.एका कुटुंबाला किती ब्राससाठी रॉयल्टी माफ करावी?, वडार समाजाच्या नावावर अन्य कोणी गैरफायदा घेणार नाही असे नियम करावेत, राज्यात वडार समाज किती?, रॉयल्टी माफ केली तर महसूल किती बुडेल, या सर्व बाबींचा विचार करुन निर्णय घेण्यात येईल, असे महसूल मंत्र्यांनी सांगितले. -----------------...या केल्या मागण्याकिमान एका कुटुंबाला वर्षाला ५०० ब्राससाठी रॉयल्टी माफ करावीबेकायदेशीर उत्खनन केलेल्या दगड खाणीवर जिल्हाधिकाऱ्यांनी केलेली दंडात्मक कारवाई मागे घ्यावीखाणपट्टा लवकर उपलब्ध करुन द्यावा--------------------------------वडार समाजाची उपजीविका दगड खाणीवर अवलंबून आहे. अलीकडे शासनाने मोठ्या प्रमाणावर रॉयल्टी आकारणी सुरू केल्याने हा व्यवसाय अडचणीत आला आहे. यामुळेच रॉयल्टी माफ करण्याची आमची मागणी आहे.- शंकर चौगुलेमाजी उपाध्यक्ष, लेबर फेडरेशन
दगड खाणीवरील रॉयल्टी माफ करण्यावर झाली चर्चा
By admin | Published: June 11, 2014 12:29 AM