शीतलकुमार कांबळे सोलापूर : श्वेत त्वचा आजार किंवा कोड याविषयी अनेक गैरसमज लोकांमध्ये आहेत. यापैकी सर्वात मोठा गैरसमज म्हणजे हा आजार संसर्गजन्य नाही. त्यामुळे श्वेत त्वचा आजार असलेल्या एखाद्या व्यक्तीस स्पर्श केल्याने दुसºया व्यक्तीस हा आजार होत नाही. त्वचेला रंग देणाºया मृत झाल्यास हा आजार जडतो; पण तो बरा होऊ शकतो, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.
श्वेत त्वचा (कोड) आजार होणे याचे नेमके असे कारण नाही. हा आजार अनुवंशिक असतोच असेही नाही. जगभरात पांढरे डाग होण्याचे प्रमाण एक टक्का आहे. भारतात ते दोन ते अडीच टक्के आहे. हे डाग कधीच जन्मत: नसतात. ते कोणत्याही वयात होऊ शकतात. या डागांमुळे दुखणे, ताप येणे, स्राव होणे असा कोणताही त्रास होत नाही. शरीराच्या त्वचेला रंग देणाºया पेशी या कमी किंवा मृत झाल्या तर हा आजार होतो. शरीराच्या एका ठिकाणी हा आजार झाला तर तो पसरण्याची शक्यता फक्त एक टक्का असते. ९९ टक्के प्रकारात हा श्वेत त्वचा आजार पसरत नाही.
शरीराच्या संपूर्ण भागावर चट्टे असतील तर त्याला विटीलिगो वलगारीस तर फक्त ओठांवर, बोटांच्या टोकावर व गुप्तांगावर चट्टे असतील तर त्याला लिप टिप विटीलिगो असे म्हटले जाते. एकाच ठिकाणी आढळणारा चट्टा असेल तर त्याला लोकलाईज्ड विटीलिगो म्हणतात. जर का चट्टे वेगाने उमटत असतील तर त्याला अनस्टेबल विटीलिगो असे म्हणतात.
या आजारात अनेक प्रकार आहेत. यात केसांमध्ये पांढरे चट्टे येणे, ओठांवर चट्टे येणे, पांढरे चट्टे पसरत जाणे आदी प्रकार आहेत. बºयाच जणांना श्वेत त्वचा आजार व कुष्ठरोग हा एकच आहे असे वाटते, पण कुष्ठरोग हा संसर्गजन्य रोग असून, श्वेत त्वचा आजार हा संसर्गजन्य नाही. औषधोपचार, लेसर, शस्त्रक्रिया, मलम लावणे या प्रकाराचे उपचार घेतल्याने हा आजार बरा होऊ शकतो. रोग प्रतिकारक शक्ती कमी झाल्याने त्वचेला रंग देणाºया पेशी कमी किंवा मृत होतात, यामुळेदेखील हा आजार होऊ शकतो.
श्वेत त्वचा आजार झाल्याचे लक्षात आल्यानंतर त्यावर लगेच उपचार घेणे गरजेचे आहे. रोग प्रतिकारक शक्ती चांगली असल्यास हा आजार होत नाही. यासाठी सकस आहार घेणे, ध्यान करणे, व्यायाम करणे गरजेचे आहे. - डॉ. प्रकाश दुलंगे, त्वचारोग तज्ज्ञ
पांढरे पदार्थ खाल्ल्याने श्वेत त्वचा आजार होतो अशा प्रकारचा गैरसमज दूर होणे गरजेचे आहे. हा आजार होऊ नये म्हणून पथ्य पाळण्याची आवश्यकता नाही. हा आजार झाल्यास उपचाराच्या अनेक पध्दती उपलब्ध आहेत. - डॉ. सचिन कोरे, त्वचारोग तज्ज्ञ