सोलापूर : तत्कालीन जिल्हाधिकाºयांनी स्थापन केलेली भ्रष्टाचार निर्मूलन समिती कामकाजाला सुरुवात न करताच बरखास्त झाली असून नव्याने समिती स्थापन करण्याबाबतची प्रक्रिया चार महिन्यांपासून सुरू आहे. उत्तर सोलापूर तालुक्याची ही अवस्था आहे.
तत्कालीन जिल्हाधिकारी रणजितकुमार यांनी २१ जानेवारी २०१७ रोजी एका पत्रान्वये या समितीवर मार्डी येथील विष्णू जगताप, भागाईवाडीच्या सरपंच कविता शिवाजी घोडके-पाटील, तिºहे येथील गुरुदेव गायकवाड व शेळगीचे इरय्या पुराणिक यांची अशासकीय सदस्य म्हणून निवड केली होती. यापैकी काही सदस्यांना निवडीचे पत्र दिले तर काहींना अद्याप पत्रही दिले नाही; मात्र या समितीची अद्यापपर्यंत एकही बैठक झाली नाही.
दरम्यान, सध्याचे जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी उत्तर सोलापूर तहसीलदारांना ४ डिसेंबर २०१७ रोजीच्या पत्रान्वये भ्रष्टाचार निर्मूलन समितीवर अशासकीय सदस्य निवडण्यासाठी १५ दिवसात नावे सुचवावीत व प्रांताधिकाºयांनी संबंधित व्यक्तीचे पोलीस अहवाल पडताळून इकडील कार्यालयाला मंजुरीसाठी सादर करावे, असे म्हटले आहे. याच पत्रात शासकीय संरक्षण दलातील सेवानिवृत्त व्यक्ती, स्वातंत्र्यसैनिक, स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधी, लोकांचा विश्वास संपादन केलेली व्यक्ती, लोकप्रतिनिधी, आण्णा हजारे सुचवतील ती व्यक्ती, प्राचार्य व समाजसेवक यांचा समितीमध्ये समावेश असावा असे म्हटले आहे.
प्रांताधिकारी कार्यालय विसरभोळे - जिल्हाधिकारी कार्यालयाने भ्रष्टाचार निर्मूलन समिती स्थापन करण्याबाबत १५ दिवसात नावे सुचवावीत असे पत्र उत्तर तहसील कार्यालयाला ४ डिसेंबर २०१७ रोजी दिले. सोलापूर प्रांताधिकाºयांनी २४ जानेवारी रोजी या पत्राचा संदर्भ देत तब्बल ५२ दिवसांनी उत्तर तहसीलला पत्र दिले आहे. जिल्हाधिकाºयांच्या पत्राचा ५२ दिवसांनी विचार करणाºया प्रांताधिकाºयांना समिती स्थापनेसाठी नावे येण्यासाठी पाठपुरावा करण्याचा विसर पडला आहे.
मंडल अधिकाºयाचे अजब पत्र- सोलापूर मंडलाचे तत्कालीन मंडलाधिकारी अनिल शहापुरे यांनी नेहरुनगर, सोलापूर तलाठी अखत्यारित पाच विभाग, मजरेवाडी, बाळे, खेड, कोंडी, केगाव व शिवाजीनगर या भागातील शासकीय संरक्षण दलातील सेवानिवृत्त व्यक्ती, स्वातंत्र्यसैनिक, स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधींशी चर्चा केली असता एकही व्यक्ती होकार देत नसल्याचे पत्र उत्तर तहसील कार्यालयाला दिले आहे. मार्डी व शेळगी मंडल अधिकाºयांनी अद्याप नावाच्या शिफारशीचे पत्रच दिले नाही.