अतुल खोटे यांनी फिर्यादीत म्हटले आहे की, चुलते सुभाष ज्ञानदेव खोटे हे त्यांच्या कुटुंबासह पारेवाडी येथे राहत आहेत. आमच्यात शेताच्या कारणावरून वाद सुरू आहे. सोमवारी (दि. २०) दुपारी जमीन मोजण्यासाठी गेलो असता चुलते सुभाष यांना फोन करून सांगितले की, माझे शेत कमी भरते तर तुम्ही शेत मोजण्यासाठी या. तेव्हा चुलता सुभाष तेथे आले. आम्ही दोघांनी मिळून आमचे शेत मोजण्यास सुरू केले. तेव्हा माझी शेती चुलता सुभाष यांच्या शेतात सात गुंठे आतमध्ये सरकली. त्यावेळी चुलते सुभाष यांना मी आजपासून शेती वहिवाटणार आहे असे म्हणालो. तेव्हा ते म्हणाले, ‘तू शेती वहिवाट करायची नाही, मला ही मोजणी मान्य नाही. परत शेतात आला, तर तुला ठार मारीन,’ अशी धमकी देऊन शिवीगाळ दमदाटी करून दगडाने डोक्यात मारले. डोक्यातून रक्त आल्याने गंभीर दुखापत झाली आहे.
पारेवाडीत जमीन मोजण्यावरून चुलता-पुतण्यात वाद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 23, 2021 4:25 AM