शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL Auction 2025: Shocking! 'या' १० बड्या खेळाडूंना कुणीच घेतलं नाही संघात, अखेर राहिले UNSOLD !!
2
IPL Auction 2025: जोस बटलर, मिचेल स्टार्क ते ट्रेंट बोल्ट... हे ठरले TOP 10 महागडे परदेशी खेळाडू
3
IPL Auction 2025: दोन दिवसांत १८२ खेळाडूंवर लागली बोली, 'हे' ठरले TOP 10 महागडे क्रिकेटपटू
4
IPL Auction 2025: 'नाही नाही' म्हणत शेवटी Mumbai Indians ने Arjun Tendulkar ला संघात घेतलंच, किती लावली बोली?
5
IPL Auction 2025: IPL मेगालिलाव 'सुफळ संपूर्ण'! १८२ खेळाडूंना मिळाले ६३९ कोटी, दोन दिवसांत काय घडलं?
6
महायुतीत नाराजीनाट्य? एकनाथ शिंदेंच्या भूमिकेकडे लक्ष; अजित दादा भाजपच्या बाजूने...
7
गुंतवणूकदारांवर आली डोकं झोडून घ्यायची वेळ, ₹792 वरून थेट ₹1 वर आला शेअर; ₹1 लाखाचे झाले 227 रुपये
8
IPL Auction 2025 : KKR सह RCB अन् GT ची मेहरबानी! अनसोल्ड अजिंक्य रहाणेसह या तिघांवर लागली बोली
9
'वर पाहिजे...'; एकुलता एक, 20 एकरचे फॉर्महाऊस, न पादणारा अन्...; लग्नासाठीची जाहिरात जबरदस्त चर्चेत!
10
सत्ता स्थापनेच्या हालचालींना वेग; एकनाथ शिंदे उद्या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देणार
11
IPL Auction 2025: काव्या मारनची 'स्मार्ट' खेळी! जयदेव उनाडकटने रचला मोठा इतिहास; केला अनोखा विक्रम
12
विराट म्हणाला, मी माझ्या गर्लफ्रेंडला आणू शकतो? रवि शास्त्रींनी BCCI चा नियमच बदलला होता!
13
विरोधी पक्षनेतेपदासाठी ठाकरे गट आग्रही, पण मविआ एकत्रित दावा करू शकते का? कायदा काय सांगतो?
14
IPL Auction 2025: अर्जुन तेंडुलकर UNSOLD! Mumbai Indiansसह साऱ्यांनीच फिरवली सचिनच्या मुलाकडे पाठ
15
IPL Auction 2025: १३ वर्षांचा वैभव सूर्यवंशी झाला 'करोडपती'! राजस्थानने केलं 'रॉयल' स्वागत; किती लागली बोली?
16
भाजपचे नियोजन 'King', मायक्रो प्लानिंगच्या जोरावर पक्षाला मिळवून दिला सर्वात मोठा विजय
17
IPL Auction 2025: Rohit Sharma ला 'ओपनिंग पार्टनर' मिळाला! Mumbai Indians ने ५.२५ कोटींना 'याला' संघात घेतला!
18
अमेरिकेतील 'या' शहरातून सूर्य गायब; आता थेट दोन महिन्यांनी होणार दर्शन, कारण...
19
अविमुक्‍तेश्‍वरानंद यांनी उद्धव ठाकरेंना दिला होता CM होण्याचा आशीर्वाद, आता सांगितलं माहायुतीच्या महाविजयाचं कारण 
20
कोण आहे Priyansh Arya? ज्याच्यासाठी प्रिती झिंटानं ३० लाख ऐवजी पर्समधून काढले ३.८० कोटी

जिल्ह्यात ठिकठिकाणी जल्लोष

By admin | Published: May 18, 2014 12:11 AM

लोकसभा निवडणूक निकालाचे पडसाद : पेढे वाटून, फटाके फोडून आनंदोत्सव

करमाळा : माढा लोकसभा मतदारसंघातून विजयसिंह मोहिते-पाटील विजयी झाल्याचे समजताच करमाळ्यात काँग्रेस-राष्टÑवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी गुलालाची उधळण करून फटाक्यांची आतषबाजी करून जल्लोष साजरा केला. भाजपने केंद्रात पूर्णपणे बहुमत प्राप्त केल्याने भाजपच्या कार्यकर्त्यांनी विजयोत्सव साजरा केला. आघाडीचे उमेदवार विजयसिंह मोहिते-पाटील यांचा विजय जाहीर होताच करमाळ्यात राष्टÑवादी काँग्रेस-काँग्रेसच्या सावंत गटाच्या समर्थक कार्यकर्त्यांनी चौकाचौकातून फटाक्यांची आतषबाजी करून गुलालाची उधळण करून आनंदोत्सव साजरा केला. शहरातील सावंत गल्ली,पोथरे नाका, मोहल्ला गल्ली, किल्ला वेस, सुभाष चौक, एस.टी.बसस्थानक परिसरात फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली. जिल्हा उपाध्यक्ष विजयराव पवार, सरचिटणीस सुनील सावंत, नगरसेवक संजय सावंत, प्रशांत ढाळे, दीपक सुपेकर, सुरेश इंदुरे, दादाराम लोंढे, नितीन घोलप, बाजार समितीचे संचालक बाळासाहेब गोडसे, अ‍ॅड. राहुल सावंत, फारुक बेग,अनिल किरवे,पांडुुरंग सावंत, पप्पू सूर्यवंशी, पप्पू रंदवे, अहमद कुरेशी, मतीन शेख,राजेंद्र घाडगे, वाजिद शेख, सचिन सामसे, गजानन यादव, इक्बाल पठाण, सद्दाम शेख, नागेश कसाब, श्रीकांत ढवळे, पप्पू बागवान, अनिनाथ माळी, धनंजय शिंदे, बापू उबाळे, वैभव सावंत,मंगेश सिरसट, श्रीराम गपाट या कार्यकर्त्यांसह पदाधिकारी सहभागी झाले होते. केंद्रात भाजपाने पूर्ण बहुमत मिळविल्याबद्दल भाजयुमोचे जिल्हाध्यक्ष गणेश चिवटे, जिल्हा उपाध्यक्ष किरण बोकन,तालुकाध्यक्ष शशिकांत पवार, विठ्ठल भणगे या पदाधिकार्‍यांसह शेकडो कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतषबाजी करीत गुलालाची उधळण करून आनंदोत्सव साजरा केला. तालुक्यातील जिंती येथे विजयदादाच्या विजयाप्रीत्यर्थ सरपंच सवितादेवी राजेभोसले, शहाजीराजे भोसले यांच्यासह समर्थकांनी गावात फटाके फोडून पेढे वाढून आनंदोत्सव साजरा केला. चिखलठाण येथे जि.प.चे माजी उपाध्यक्ष राजेंद्र बारकुंड, वि.का.सोसायटीचे अध्यक्ष विकास गलांडे यांनीही आनंदोत्सव साजरा केला. विजयसिंह मोहिते-पाटील यांच्या विजयाबद्दल आ.शामल बागल, माजी आ. जयवंतराव जगताप, राष्ट्रवादी काँग्रेस तालुकाध्यक्ष विलासराव घुमरे यांनी अभिनंदन केले. वार्ताहर अक्कलकोट : सोलापूर लोकसभा मतदारसंघातून केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांचा पराभव करीत भाजपाचे उमेदवार अ‍ॅड़ शरद बनसोडे हे १ लाख ५१ हजार २४२ इतक्या मतांनी विजयी झाले़ तसेच केंद्रातही भाजपालाच सर्वाधिक जागा मिळाल्याबद्दल शहरासह तालुक्यातील कार्यकर्त्यांनी जल्लोष केला़ सकाळी मतमोजणी सुरू झाल्यापासूनच पदाधिकारी व कार्यकर्ते ठिकठिकाणी टी़ व्ही़, एलसीडी लावून लोकसभा निवडणुकीचे निकाल ऐकत होते़ १२ वाजल्यानंतर अ‍ॅड़ शरद बनसोडे यांना ५० हजारांपेक्षा जास्त मताधिक्य मिळाल्याचे वृत्त कळताच भाजपा कार्यालयात नगराध्यक्ष बसलिंगप्पा खेडगी, जिल्हा सरचिटणीस सचिन कल्याणशेट्टी, नगरसेवक यशवंत धोंगडे, मल्लिनाथ आळगी, राजकुमार झिंगाडे, मिलन कल्याणशेट्टी, विक्रम शिंदे, चंद्रकांत दसले, विश्वनाथ पाटील यांनी फटाके फोडून, पेढे वाटून जल्लोष केला़ त्यानंतर शहरातील प्रमुख मार्गावर मोटरसायकल रॅली काढण्यात आली़ शहरातील ए-वन चौक, शिवछत्रपती शिवाजी महाराज चौक, विजयकामगार चौक, कारंजा चौक, फत्तेसिंह चौक, जुना अडत बाजार, समर्थ चौक, रामगल्ली, सुभाष गल्ली आदी ठिकाणी कार्यकर्त्यांनी फटाके फोडून जल्लोष केला़ तसेच कुंभारी, बोरामणी, वळसंग, तडवळ, करजगी, जेऊर, दुधनी, मैंदर्गी, चपळगाव, हन्नूर, वागदरी, शिरवळ, सलगर, पानमंगरुळ, नागणसूर, तोळणूर या गावांमध्येही कार्यकर्त्यांनी फटाके फोडून जल्लोष केला़ नेमतवाडी : माढा लोकसभा मतदारसंघातील राष्टÑवादी व कॉँग्रेस आघाडीचे उमेदवार विजयसिंह मोहिते-पाटील यांच्या विजयाने भोसे (ता. पंढरपूर) येथील जानूबाईदेवी यात्रेच्या धामधुमीत फटाक्यांची आतषबाजी करून विजयोत्सव साजरा करण्यात आला. यावेळी विठ्ठलचे संचालक राजूबापू पाटील, विकास सोसायटीचे अध्यक्ष रावसाहेब पाटील, यशवंतभाऊ पाटील पतसंस्थेचे अध्यक्ष जयवंत गावंधरे, उपसरपंच शेखर पाटील, सरपंच दगडू बनसोडे, नारायण कोरके, तात्या मस्के, बाळासाहेब पवार, सुनील तळेकर, इलाही मुलाणी, नागनाथ भांडे, औदुंबर काशीद, अविनाश श्रीखंडे, धनाजी तळेकर, भास्कर कोरके, संतोष कोरके, सोमनाथ थिटे, तानाजी गावंधरे, भारत मस्के, राजू गायकवाड, गणेश थिटे उपस्थित होते. माढा लोकसभा मतदारसंघातील राष्टÑवादी व कॉँग्रेस आघाडीचे उमेदवार विजयसिंह मोहिते-पाटील यांच्या विजयाने करकंब (ता. पंढरपूर) येथे मुक्तपणे गुलालाची उधळण करीत फटाक्यांच्या आतषबाजीत विजयोत्सव साजरा करण्यात आला. यावेळी विजय शुगर्सचे संचालक नरसाप्पा देशमुख, दिलीप पुरवत, उपसरपंच आदिनाथ देशमुख, अभिषेक पुरवत, नागेश वंजारी, नात्याबा मोहिते, संजय धोत्रे, बाळासाहेब शिंगटे, राहुल शिंगटे, सुनील मोहिते, मुस्तफा बागवान, महिंद्र पवार, सुनील धोत्रे, बाळासाहेब गुळमे, भागवत पलंगे, पांडुरंग नगरकर, बापू शिंदे, रियाज बागवान, निजाम बागवान, सावता खारे, राजू काझी, काळू धोत्रे, पांडुरंग देशमुख, सुधीर देशमुख उपस्थित होते. नातेपुते : नातेपुते येथे राज्याचे माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते-पाटील यांनी माढा लोकसभा मतदारसंघात प्रचंड मतांनी निवडून आल्याबद्दल राष्टÑवादीच्या कार्यकर्त्यांनी पेढे वाटून आनंद व्यक्त केला. यावेळी सरपंच अमरशील देशमुख, आप्पा भांड, निजाम काझी, अरविंद पांढरे, युवराज वाघमारे, संतोष काळे, रावसाहेब काळे, सुनील ढोबळे, ग्रा. पं. सदस्य बाळासाहेब सोरटे, ग्रा. पं. सदस्य बाळासाहेब काळे, महादेव बरडकर, अण्णा मंद्रे, नौशाद आतार, मयूर पाडसे, बाळू भांड, देवीदास काळे उपस्थित होते. बार्शी : लोकसभा निवडणुकीत आज झालेल्या मतमोजणीत उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघातून शिवसेना -भाजप महायुतीचे उमेदवार रवींद्र गायकवाड हे सव्वादोन लाख मतांनी विजयी झाल्यानंतर बार्शी शहर व तालुक्यात माजी आ़ राजेंद्र राऊत, राजेंद्र मिरगणे व भाऊसाहेब आंधळकर यांच्या समर्थकांनी मोठ्या प्रमाणात फटाक्यांची आतषबाजी करून जल्लोष साजरा केला़ उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघात २७ उमेदवार निवडणुकीच्या आखाड्यात असले तरी काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीचे डॉ़ पद्मसिंह पाटील, महायुतीचे रवींद्र गायकवाड व अपक्ष रोहन देशमुख अशी तिरंगी लढत झाली होती़ विजयानंतर बार्शी शहरात माजी आमदार राजेंद्र राऊत गटाच्या समर्थक कार्यकर्त्यांनी शहरातील चौकाचौकात फटाक्यांची आतषबाजी करून तसेच गुलालाची मुक्तपणे उधळण करून या विजयाचा आनंद साजरा केला़ यामध्ये बार्शी नगरपालिकेसमोर, जुना गांधी पुतळा, पांडे चौक, एकविराई गल्ली, भोसले चौक, स्टेशन रोड आदी परिसरात मोठ्या प्रमाणात फटाके फोडले़ यावेळी शरद फुरडे, नगरसेवक दीपक राऊत, माजी नगरसेवक कुमार डमरे, नाना गाढवे, माधव देशमुख, धनाजी फुरडे, भोला अडसूळ, पाचू उघडे यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते़ याचबरोबर राजेंद्र मिरगणे यांच्या नेतृत्वाखाली तेलगिरणी चौकापासून भगवंत मंदिरापर्यंत जय भवानी जय शिवाजी व बाळासाहेब ठाकरे यांच्या जयजयकाराच्या घोषणा देत व फटाक्यांची आतषबाजी करीत मिरवणूक काढली़ यावेळी शिवसैनिकांनी मिठाईचे देखील वाटप केले़ यावेळी संतोष गणेचारी, बाळासाहेब पवार, किरण गायकवाड, भाजपचे धनंजय जाधव, विलास लांडे, बाळासाहेब मुळे, पुरुषोत्तम गोरे, मदन गव्हाणे, शिरीष घळके, दत्ता जाधव, सूरज गव्हाणे, माजी उपनगराध्यक्ष रामराजे पवार, अजय दराडे, सुनील चौगुले, पंडित मिरगणे उपस्थित होते़ याचबरोबर शिवसेना नेते भाऊसाहेब आंधळकर यांच्या नेतृत्वाखाली शहरातील पांडे चौकात हलगीच्या निनादात गुलालाची उधळण करून फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली़ यावेळी शहर प्रमुख दीपक आंधळकर, नागजी नान्नजकर, बाबासाहेब कापसे, जयगुरू स्वामी, माऊली पवार, शिवसेना तालुकाप्रमुख काकासाहेब गायकवाड यांच्यासह शेकडो शिवसैनिक उपस्थित होते़ कोरफळे : उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघातून महायुतीचे उमेदवार प्रा़ रवींद्र गायकवाड यांच्या विजयाने कोरफळे (ता़ बार्शी) येथे पेढे वाटून, गुलालाची उधळण करीत व फटाके फोडून जल्लोष केला़ यावेळी अबकी बार मोदी सरकारच्या घोषणाने परिसर दुमदुमून गेला होता़ सकाळी ८ वाजता मतमोजणीला प्रारंभ झाल्यानंतर पदाधिकारी व कार्यकर्ते मंडळी टी़ व्ही़ समोर बसून फेरीनिहाय मतमोजणीची आकडेवारी पाहत होती़ काही जण फोनवरून एकमेकांना माहिती घेत होते, देत होते़ दुपारी १ वाजता महायुतीचे रवींद्र गायकवाड हे विजयी झाल्याचे घोषित करताच कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला़ यावेळी विठ्ठल फरड, मिठू मिरगणे, नागा टोणगे, संजय जगताप, नागनाथ वांगदरे, शंकर ढोरे, हणुमंत जगताप, जयराम टोणगे, सुनील डांगे यांनी जल्लोष केला़ माढा : माढा लोकसभा मतदारसंघातील राष्टÑवादी-काँग्रेस आघाडीचे उमेदवार विजयसिंह मोहिते-पाटील हे विजयी झाल्याचे समजताच माढा शहर व परिसरातील कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतषबाजी करुन जल्लोष साजरा केला. यावेळी पेढे वाटप करुन रॅली काढून आनंद व्यक्त केला. माढा शहरात शिवाजी चौकात पंचायत समिती सदस्य पृथ्वीराज सावंत, ग्रामपंचायत सदस्य गुरुराज कानडे, दादा साठे यांनी व कार्यकर्त्यांनी फटाके उडवून आनंदोत्सव साजरा केला. मध्यवर्ती छत्रपती संभाजी महाराज जयंती महोत्सव यांच्या कार्यकर्त्यांनी माढा शहरातून रॅली काढली. यासाठी सचिन चवरे, महेश चवरे, बापू पाटील, प्रवीण चवरे, सचिन पाटील, प्रतीक जाधव, वैभव भांगे, प्रदीप भांगे, पप्पू साठे, अविनाश चवरे, पिंटू कानडे, ईश्वर जगदाळे आदी उपस्थित होते. केवड येथे सज्जन पाटील मित्रमंडळाच्या वतीने फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली. यावेळी पोलीस पाटील सज्जन पाटील, आप्पा मिरगणे, ग्रामपंचायत सदस्य अमोल लटके आदी उपस्थित होते. अंजनगाव खेलोबा येथील कार्यकर्त्यांनी फटाके उडवून व गुलालाची मुक्तपणे उधळण करुन जल्लोष साजरा केला. यावेळी माजी सरपंच भागवत चौगुले, माजी ग्रामपंचायत सदस्य बापूवेल रावडे, वैजिनाथ चौगुले, सचिन चौगुले, समाधान इंगळे, प्रदीप नाईकनवरे आदी उपस्थित होते.

---------------------------------------

आनंद आणि दु:खही ४केंद्रात महायुतीस पूर्ण बहुमत मिळून सरकार आल्याबद्दल शिवसेना-भाजप व शेतकरी संघटनेच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांना आनंद झाला खरा, पण माढ्यात सदाभाऊ खोत यांचा पराभव झाल्याने नारायण पाटील, महेश चिवटे, शशिकांत पवार, गणेश चिवटे यांच्यासह अनेक भाजप-सेना व शेतकरी संघटनेच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांच्या चेहर्‍यांवर दु:खाची लकेर दिसून आली.

-----------------------

अक्कलकोटचा पहिला खासदार ४देश स्वतंत्र झाल्यापासून तालुक्याला अ‍ॅड़ शरद बनसोडे यांच्या रूपाने पहिलाच खासदार मिळाला आहे़ अ‍ॅड़ बनसोडे तालुक्यातील पानमंगरुळ येथील रहिवासी आहेत़ तालुक्यातून त्यांना २५ हजार ८६१ मते मिळाली आहेत़