सोलापूर : गुढीपाडवा व डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या पार्श्वभूमीवर रेशन दुकानातून गरीबांना आनंद शिधा वाटप करणार असल्याचे घोषित केले. मात्र गुढीपाडवा होऊन आठवडा लोटला तरीही आनंद शिधा गरीबांना मिळालाच नाही. आता आंबेडकर जयंतीपूर्वी तरी शिधाचे वाटप होईल का असा सवाल उपस्थित केला आहे. वेळेत शिधा वाटप न झाल्यास आंदोलनाचा इशारा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाने दिला आहे.
महाराष्ट्र राज्य सरकारने "गुडी पाडवा "आणि डाॅ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त रेशन धान्य दुकानदारांना मार्फत वाटप करण्यात येणार असल्याबाबत घोषित केले परंतू गुढीपाडवा गेला आणि आता १४ एप्रिल रोजी डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती येत आहे तरी सुध्दा या आनंद शिधा वाटपाची काहीच हालचाल दिसून येत नाही. शहर व जिल्हा पुरवठा कार्यालयात तर रोज वेगवेगळी कारणे वेगवेगळ्या बातम्या या शिवाय काहीच नाही, त्यामुळे कमीत कमी डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती पर्यत तरी या आनंद शिधा वाटप करण्यात यावे अन्यथा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया व रिपब्लिकन अल्पसंख्याक विभाग सोलापूर च्या वतीने तिव्र आंदोलन करणयात येईल असा इशारा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने निवासी उपजिल्हाधिकारी शमा पवार यांच्याकडे निवेदनाव्दारे केली आहे. यावेळी प्रदेशाध्यक्ष सुबोध वाघमोडे, डाॅ. राजकुमार सोनवले, जककापा कांबळे, रावसाहेब परीकक्षाळे, मुकुंद काबंळे, श्रीमंत गायकवाड, मारुती सोनवले, धर्मा माने, सलीम मुल्ला, शिकंदर शेख, रफिक शेख, समीर मुजावर, इम्रान शेख आदी उपस्थित होते.