दक्षिण सोलापूर तालुक्यातील कोरोनाबाधित रुग्णांना ऑक्सिजन कमी पडू नये यासाठी अप्पासाहेब पाटील-वडकबाळकर यांच्या पुढाकारातून विभा इन्जो कॅलिफोर्निया,अमेरिका येथील सामाजिक संस्थेकडून ७ ऑक्सिजन कॉन्सेंट्रेटर मशीनचे मान्यवरांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले.
मंद्रूप येथील ग्रामीण रुग्णालयात या मशीनचे आरोग्य विभागाकडे प्रांतधिकारी दीपक शिंदे यांच्या हस्ते देण्यात आले. प्रांतधिकाऱ्यांनी या दानशूरांचे आभार मानावे तितकेच कमी आहे, असे गौरवोद्गार काढले.
अप्पासाहेब पाटील-वडकबाळकर यांनी येत्या काळात आणखीन मशीन मागवून जनतेच्या सेवेत अर्पण करणार असल्याचे सांगितले.
यावेळी मंद्रूपच्या अपर तहसीलदार उज्ज्वला सोरटे, मंद्रूप ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. उमा वाघमोडे, डाॅ.संगीता नलावडे, नीलम घोगरे, देवेंद्र वाले, सचिन बगले, रेवणसिद्ध भिंगे, सिध्दार्थ हविनाळे, सागर हत्तूरे आदी उपस्थित होते.
---
२८ऑक्सिजन
मंद्रूप ग्रामीण रुग्णालयात ७ ऑक्सिजन कॉन्सेंट्रेटर मशीनचे लोकार्पण करताना उज्ज्वला सोरटे, वैद्यकीय अधीक्षक डॉ. उमा वाघमोडे, डाॅ.संगीता नलावडे, नीलम घोगरे, देवेंद्र वाले, सचिन बगले, रेवणसिद्ध भिंगे, सिद्धार्थ हविनाळे, सागर हत्तूरे आदी.
----
---