भिमानगर : माढा वेल्फेअर फाउंडेशनच्या वतीने टेंभुर्णीतील आशा वर्कर्स यांनी कोरोना काळात रुग्णांच्या घरोघरी जाऊन सेवा दिली. याबद्दल माढा वेल्फेअरचे संस्थापक अध्यक्ष धनराज शिंदे यांच्या माध्यमातून १० आशा वर्कर्स यांना सायकल देऊन सन्मान करण्यात आला.
माढा तालुक्याचे आमदार बबनराव शिंदे व करमाळ्याचे आमदार संजय मामा शिंदे, झेडपी सदस्य रणजित शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम पार पडला. राष्ट्रवादी युवक काँग्रेस टेंभुर्णी शहराध्यक्ष मयूर काळे यांनी यासाठी पुढाकार घेतला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राष्ट्रवादी विधानसभा अध्यक्ष रमेश पाटील, अकोले खुर्द मा. सरपंच महादेव घाडगे, राष्ट्रवादी युवकचे तालुकाध्यक्ष संभाजी पाटील, टेंभुर्णी शहर राष्ट्रवादी महिला अध्यक्ष सविता जगताप, राष्ट्रवादी युवक तालुका उपाध्यक्ष रामभाऊ नवले, संजय मिस्कीन, राष्ट्रवादी विद्यार्थी तालुकाध्यक्ष मेघराज पाटील, ओबीसी सेल तालुका उपाध्यक्ष अतुल कासवेद, पदवीधर तालुका उपाध्यक्ष उत्तम महाडिक, टेंभुर्णी राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस शहराध्यक्ष रवींद्र बेद्रे, भिमानगर, धवल पाटील, राष्ट्रवादी सदस्य अलीम शेख, तुषार काशीद, रोहन साळुंखे, बालाजी गायकवाड होते.
----
फोटो : २३ माढा वेल्फेअर
माढा वेल्फेअरच्या वतीने आशा वर्कर्सना सायकल वाटप करताना मयूर काळे, रमेश पाटील, महादेव घाडगे, संभाजी पाटील, सविता जगताप,