सांगोला : कोरोना महामारीला घाबरून न जाता प्रत्येकाने हा संसर्ग आपल्याला होणार नाही याची काळजी घ्यावी. टाळेबंदीच्या कालावधीमध्ये काही अडचणी असल्यास थेट माझ्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करीत हातावर पोट असणाऱ्या २२५ गोरगरीब मजुरांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप केले. यामध्ये साखर, पोहे, तूरडाळ, मसूर डाळ, साबण, बिस्किटे, निरमा, मीठ, शेंगदाणे, गहू, तांदूळ, तेल, मास्क यांचा समावेश आहे. यावेळी सूर्यकांत मेटकरी, धनगर सेवा समाज मंडळाचे अध्यक्ष दत्तात्रय जानकर, तायाप्पा माने, आसपाक मुलाणी, रवी पवार, राजू उकरंडे, रोहित उंडाळे, भीमराव नायकुडे, सचिन मोहिते, विनोद ढोबळे, बिरा खांडेकर, संतोष देवडकर, आयुष्य जमादार, प्रवीण गावडे, प्रज्वल निंबाळकर, विकी पवार, प्रवीण गावडे, सौरभ मेटकरी, सोहम मेटकरी आदी उपस्थित होते.
२२५ जणांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 25, 2021 4:25 AM