सोलापूर : भारतीय संस्कृतीत सर्वात मोठा सण म्हणजे दिवाळी. शेतकऱ्यांच्या फडातील ऊस रात्रंदिवस तोडणारे कामगार आणि तोडलेली ऊस वेळेवर पोहचवणारे ऊस वाहक गाडीचे चालक यांचा योगदान शेतकऱ्यांच्या दृष्टीने अनमोल असते.
सणासुदीच्या काळात श्री.सिद्धेश्वर सहकारी साखर कारखान्यावर शेतकऱ्यांची सेवा करणाऱ्या ऊस तोड कामगार आणि चालक यांना दिवाळीचा आनंद घेता यावा यासाठी सोलापुरातील एम.के.फाउंडेशन या सामाजिक संस्थेच्या वतीने संचालक गणेश कट्टीमनी यांच्या सहकार्याने, एम.के.फाउंडेशनचे संस्थापक महादेव कोगनुरे यांच्या मार्गदर्शनानुसार फराळ वाटप करण्यात आला.
शेतकऱ्यांचे तोडलेली ऊस वेळेवर कारखान्यावर न पोहचवल्यास त्याचे वजन घटण्याची शक्यता असते. एक-दोन दिवसांपासून थांबलेल्या चालकांना फाउंडेशन कडून फराळ मिळाल्यावर त्यांना आनंद वाटला.
यावेळी फाउंडेशनचे संचालक संतोष उकरंडे, विशाल धोत्रे,श्रीशैल हिप्परगी आदी उपस्थित होते.