आश्रमशाळा सुरू होत नाही. तोपर्यंत ही मदत सुरूच राहणार आहे. संस्थेचे सचिव महेश हरहरे यांनी आश्रमशाळेत प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांच्या पालकांची आर्थिक अडचण ध्यानी घेऊन सामाजिक बांधिलकीतून मदतीचा हात देण्याची संकल्पना संस्थेतील शिक्षकांसमोर मांडली. त्यानंतर घरपोच अन्नधान्य व खाद्य देण्याचा उपक्रम सुरू झाला.
या आश्रमशाळेत लातूर, उस्मानाबाद, बीड, सोलापूर, परांडा, परळी, पाथरी, माजलगाव यांसह अन्य भागांतील १२० विद्यार्थी वेगवेगळ्या वर्गात शिक्षण घेत आहेत.
या उपक्रमास नवयुग शिक्षण सामाजिक संस्था संचालित मातोश्री गोदावरी हरहरे प्राथमिक व माध्यमिक निवासी आश्रमशाळेचे मुख्याध्यापक किरण जाधव, सुनील काळे यांच्यासह सर्वच शिक्षकांनी पाठबळ दिले.
----
पालकांचे व्यवसाय लाॅकडाऊनमुळे ठप्प आहेत. त्यातच हे विद्यार्थी शाळेतून घरी गेल्याने घर कसे चालवायचे. ही उणीव ध्यानी घेऊन शाळेतील १२० विद्यार्थ्यांना घरपोच अन्नधान्य व खाद्य दिले जात आहे.
- किरण जाधव, मुख्याध्यापक, मातोश्री आश्रमशाळा
----
०६ माढा
मातोश्री हरहरे या प्राथमिक व माध्यमिक निवासी आश्रमशाळेतील निवासी विद्यार्थ्यांना त्यांच्या घरी जाऊन अन्नधान्य वाटप करताना.