अध्यक्षस्थानी तंटामुक्त समितीचे माजी अध्यक्ष अंबणप्पा भंगे होते. यावेळी ज्येष्ठ नेते के.बी. पाटील, ग्रा.पं. सदस्य परमेश्वर वाले, श्रावण गजधाने, सिद्धाराम भंडारकवठे, बसवराज बाणेगाव, बसलिंगप्पा रामपुरे, गणेश कोळी, प्रशांत पाटील उपस्थित होते.
सोडिअम हायपोक्लोराइडच्या माध्यमातून गटारी, अस्वच्छतेचे ठिकाण स्वच्छ करण्यासाठी उपयोग होतो, असे उमेश पाटील यांनी सांगितले. यावेळी चपळगावसह पंचक्रोशीतील चुंगी, कुरनूर, दहिटणे, सिंदखेड, मोट्याळ, बावकरवाडी, डोंबरजवळगे, बोरेगाव या ग्रामपंचायतींना या साहित्याचे वाटप केले.
यावेळी डोंबरजवळगेचे सरपंच चिदानंद माळगे, बोरेगावचे स्वप्नील बणजगोळे, बावकरवाडीचे पांडुरंग चव्हाण, सुरेश सुरवसे, संजय वाले, विजय कोरे, गुंडा सराटे उपस्थित होते. कोरोनाचे नियम पाळत कार्यक्रम पार पडला. आभार बसवराज पाटील यांनी मानले. (वा.प्र.)
कोट :::::::::::
शेजारधर्म मोलाचा आहे ही बाब ओळखून चपळगाव पंचक्रोशीतील ग्रामपंचायतींना सोडिअम हायपोक्लोराइडचे वाटप केले आहे. जनतेच्या आरोग्याची काळजी वाटते. कोरोनापासून बचाव करण्यासाठी स्वच्छता राखणे महत्त्वाचे आहे.
-उमेश पाटील,
सरपंच, चपळगाव
फोटो
१२चपळगाव०१
ओळी
गाव स्वच्छतेसाठी सोडियम हायपोक्लोराइडचे वाटप करताना बणप्पा भंगे, के.बी. परमेश्वर वाले, श्रावण गजधाने, सिद्धाराम भंडारकवठे, बसवराज बाणेगाव, बसलिंगप्पा रामपुरे, गणेश कोळी आदी.